मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? रुग्णसंख्या वाढीचा वेग पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त

मुंबईत (Mumbai) कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने तिसऱ्या लाट (Third wave) सुरू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Covid-19

Covid-19

Sarkarnama

मुंबई : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा धोका वाढला आहे . या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी कठोर निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्र (Mahrashtra) आणि दिल्ली सरकारनेही असे निर्बंध घातले आहेत. तरीही मागील 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत मुंबईत (Mumbai) 70 टक्के तर दिल्लीत (New Delhi) 50 टक्के वाढ झाली आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) सुरू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबईत रुग्णसंख्या वाढीचा वेग पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा आता जास्त आहे. पहिल्या लाटेत 706 वरुन 1 हजार 367 रुग्णांचा आकडा गाठण्यासाठी 12 दिवस लागले होते. दुसऱ्या लाटेत 20 दिवसांत रुग्णसंख्या 683 वरुन 1 हजार 325 वर गेली होती. आता मुंबईत चारच दिवसांत रुग्णसंख्या 683 वरुन 1 हजार 325 वर गेली आहे. यामुळे मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आल्याचे मानले जात आहे. राज्यात मागील 24 तासांत कोरोनाचे 2 हजार 172 नवीन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. याचवेळी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नोंदवण्यात आलेला नाही.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मागील 24 तासांत 70 टक्के वाढ झाली आहे. मागील 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 1 हजार 377 रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच निर्बंध जाहीर केले आहेत. यानंतर मुंबई महापालिकेनेही निर्बंध लागू केले आहेत. असे असले तरी रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मुंबई महापालिकेसह राज्य सरकारची चिंता वाढली आहे.

<div class="paragraphs"><p>Covid-19</p></div>
नितेश राणेंच्या अडचणीत वाढ; न्यायालयाकडून दिलासा नाहीच

दिल्ली सरकारने कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यांमुळे यलो अलर्ट जाहीर केला आहे. याचबरोबर अंशत: लॉकडाऊनही लागू केले आहे. मागील 24 तासांत दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत 50 टक्के वाढ झाली आहे. या काळात 496 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत 2 जूननंतरही ही उच्चांकी रुग्णसंख्या आहे. दिल्लीतील पॉझिटिव्हीटी दर 0.89 टक्क्यांवर पोचला असून, तो 31 मे नंतरचा उच्चांकी आहे.

<div class="paragraphs"><p>Covid-19</p></div>
भाजपनं चुकून आपल्याच पक्षाच्या उद्योगपतीवर छापे मारले!

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज आहे. भारतात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. परंतु, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. तिसरी लाट भारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला येईल. ही लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचेल, असाही अंदाज आहे. ओमिक्रॉन हा अतिशय वेगाने संसर्ग होणारा आहे. यामुळे केंद्रासह राज्यांच्या आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. केंद्र सरकार यामुळे खडबडून जागे झाले आहे. केंद्र सरकारने कोरोनाचे रुग्ण जास्त आढळणाऱ्या 10 राज्यांमध्ये पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com