Rohit Pawar T-Shirt: 'फक्त मुद्द्याचं बोलूया…' रोहित पवारांच्या टी- शर्ट 'लूक'ची विधानभवनात चर्चा

Rohit Pawar New Look: 'फॉर्मल ड्रेस' मधील रोहित पवार चक्क टी शर्ट घालून विधानसभेत आले
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

उत्तम कुटे

Rohit Pawar T-Shirt In Monsoon Session: शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार नेहमी 'फॉर्मल ड्रेस'मध्ये असतात. मात्र, बुधवारी ते चक्क 'टी शर्ट' घालून राज्य विधीमंडळाच्या मुंबईतील पावसाळी अधिवेनात आल्याने त्याची मोठी चर्चा झाली. त्याच्या या लुकमागे एक मोठ्ठं कारण दडलय. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित यांनी त्यांच्या मतदारसंघातील MIDC आणि युवकांचा रोजगाराचा विषय पावसाळी अधिवेशनात लावून धरला. त्याची दखल मतदारसंघाबाहेरच्या त्यांच्या एका मित्राने घेतली. त्याने रोहित पवार यांना टी-शर्ट भेट म्हणून दिला. तोच टी- शर्ट आज रोहित पवार विधानसभेत घालून आलेत. त्या टी- शर्टवर समोरच्या बाजूला 'MIDC' आणि मागच्या बाजूला

‘ध्येय विकासाचं ठेवूया,

वेध भविष्याचा घेऊया

युवाशक्तीला संधी देऊया

आणि फक्त मुद्द्याचं बोलूया!....

अशा ओळी लिहिल्या आहेत. सध्या पवारांनी उचलून धरलेल्या प्रश्नाबाबतीतच या ओळी होत्या, त्यामुळे हा टी शर्ट रोहित पवार घालून येताच विधानभवनात तो चर्चेचा विषय ठरला.

सध्या सुरु असलेल्या व्देषाच्या राजकारणावर प्रहार करणाऱ्याही होत्या. विधीमंडळात वा संसदेतही सध्य़ा मुद्याचे सोडून इतर विषयांवरच नाहक चर्चा करून अमूल्य वेळ दवडला जातोय. महत्त्वाच्या मुद्यांऐवजी गुद्यांवरच तुलनेने अधिक बोलले जात आहे. त्यावर या टी शर्टच्या पाठीमागे लिहिलेल्या चारोळीतून प्रहार करण्यात आला आहे. 'विकासाचे ध्येय ठेवून फक्त मुद्याचे बोलूया', असेही आवाहन केले गेले आहे. तसेच भविष्याचा विचार करून भविष्याचा वेध घेत युवाशक्तीला संधी देण्याची अपेक्षा त्यातून व्यक्त करण्यात आली आहे. समर्पक आणि नेमका संदेश देणारी ही चारोळी या टी - शर्टवर लिहिली आहे.

Rohit Pawar
Nitesh Rane Vs Abu Azmi: औरंगजेबवरून विधानसभेत 'दंगल'! नितेश राणे अन् अबु आझमी भिडले

"टी शर्ट व त्यावरील निश्चयाच्या चारोळी आवडल्याने तो घालून विधानभवनात आल्याचे", रोहित पवारांनी सांगितले. मनातला निश्चिय टी-शर्टवर रेखाटत युवांच्या मुख्य प्रश्नांवरून ढळायचं नाही, हा मेसेज देण्याची त्याची कल्पना आवडली. "विधानभवनात भेटलेले फॅशनची आवड असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही हा टी शर्ट आवडल्याचे", रोहित म्हणाले. महाविकास आघाडी सरकार असताना एसटीच्या प्रश्नावर आंदोलन करणारे आज सत्तेत असल्याने त्यांनी हा प्रश्न सोडविला पाहिजे,अशी कोपरखळी त्यांनी मारली. त्या आंदोलनात काही वकील हे नेते म्हणून पुढे आले,त्यांनी पैसे खाल्ले,ते भाजपचे प्रवक्ते होते,असा हल्लाबोल त्यांनी नाव न घेता अॅड. गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नीवर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार देण्याच्या कालच्या " पुण्यातील सोहळ्यात शरद पवार यांनी उपस्थित राहण्य़ामागे त्यांना द्वेषाचे राजकारण हे आज जसं सुरु आहे तसं पूर्वी नव्हतं,हा संदेश द्यायचा असेल",असे रोहित म्हणाले. तसेच या पुरस्कार वितरणाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे ही हजर होते,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Edited : Rashmi Mane

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com