NCP News : पुण्यानंतर आता ठाण्यात दोन राष्ट्रवादींची 'दिलजमाई'; एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार?

Ajit Pawar NCP News : ठाण्यात दोन राष्ट्रवादींनी एकत्रित येण्याबाबत चाचपणी सुरु केली असून त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार आहे.
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Thane News : आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडीला वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पाच दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यातच आता एकमेकांच्या पक्षासोबत युती करण्याकडे सर्वच पक्षाचा कला दिसत आहे.

बुधवारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरेंची मनसे एकत्र येणार असल्याची घोषणा झाल्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता ठाण्यात दोन राष्ट्रवादींनी एकत्रित येण्याबाबत चाचपणी सुरु केली असून त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हे गूढ कायम आहे. त्यातच जागावाटपाबाबत चर्चा सुरु असल्याचे समजते. त्यामुळे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाण्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महायुतीतून निवडणूक लढवली होती. आता त्या ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे समजते.

Ajit Pawar, Sharad Pawar
ShivSena Vs BJP : भाजपला थोपवण्यासाठी सिंधुदुर्गचा पॅटर्न मराठवाड्यात राबवणार? युतीचे 12 वाजताच शिवसेनेकडून तिसरा प्लॅन अॅक्टिव्ह

आता ठाण्यात महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला म्हणाले, "जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) आमचे दुश्मन नाहीत. 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे." असे राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar, Sharad Pawar
Congress BMC election : आघाडी तुटूनही काँग्रेस निभावणार छुपी मैत्री? मुंबईत ठाकरेंना फायदा होण्यासाठी व्यूहरचना

आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीनंतर ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असे सूचक वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केले. त्यामुळे ठाण्यातील शरद पवार गट देखील आता एक पाऊल पुढे टाकून अजित पवार गटासोबत युतीचा विचार करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे

Ajit Pawar, Sharad Pawar
NCP Minister Performance : शिवसेनेची राष्ट्रवादीला टशन : अजितदादांची 3 मंत्र्यांच्या सुमार कामगिरीवर प्रचंड नाराजी

दरम्यान, मनसेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने राज्यातील महापालिकांवर कोणत्या पक्षाचा विजयाचा झेंडा रोवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता ठाण्यात दोन राष्ट्रवादींनी एकत्रित येण्याबाबत चाचपणी सुरु केली असून त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Eknath Shinde News: ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अन् काही तासांतच एकनाथ शिंदेंचा BMC निवडणुकीसाठी मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com