Eknath Shinde News: ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अन् काही तासांतच एकनाथ शिंदेंचा BMC निवडणुकीसाठी मोठा निर्णय

Shivsena BMC Election: मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महायुतीकडूनही येत्या 48 तासांत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे.
Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News :राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर आता 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. एकीकडे महायुतीतील भाजपनं एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) शिवसेनेसोबतच्या युतीची घोषणा केली असतानाच आता महाविकास आघाडीतील काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आहे.

अशातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचीही अखेर घोषणा झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादीही लवकरच एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूक प्रचारांची फौज मैदानात उतरवण्यात आली आहे.

शिवसेनेचे मु्ख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत दणदणीत कामगिरी करतानाच 61 जागा मिळवल्या.महायुतीत भाजपखालोखाल शिवसेना सर्वाधिक जागा जिंकणारा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.या दमदार विजयानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईत निवडून आलेल्या सर्व नगराध्यक्षांचा जाहीर सत्कारत करत त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली.

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बुधवारी(ता.24)स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही स्टार प्रचारकांची यादी संजय मोरे यांनी जाहीर केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक 2025-26 च्या धर्तीवर शिवसेना पक्षानं तब्बल 40 जणांना "स्टार प्रचारक" म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Prashant Jagtap: सुप्रिया सुळेंनी प्रशांत जगतापांच्या 'नाराजीनाट्याचा विषय एका वाक्यातच संपवला; म्हणाल्या, 'लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, घरी...'

शिवसेनेच्या विधान परिषदेच्या महिला आमदार भावना गवळी यांना मात्र महापालिका स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. यापूर्वी त्यांचा नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश होता. शिवसेना शिंदे गटाकडून आता आपल्या स्टार प्रचारकांची यांदी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय व राज्य मंत्री, खासदार,आमदार,प्रवक्ते तसेच तडफदार युवा नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेची धडाडती तोफ असलेल्या रामदास कदम, योगेश कदम, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे,संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, दीपक केसरकर यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळे या मातब्बर आणि सभा गाजवणा नेत्यांचा समावेश शिवसेनेकडून आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.

Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
BJP Vs MNS : उद्धव ठाकरेंशी हात मिळवताच पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'चा फडणवीसांना इशारा; संतापलेल्या भाजपनं राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओच काढला बाहेर

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना(Shivsena) आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महायुतीकडूनही येत्या 48 तासांत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे.

शिवसेना स्टार प्रचारकांची यादी पुढीलप्रमाणे:

एकनाथ शिंदे

रामदास कदम

गजानन कीर्तीकर

आनंदराव अडसूळ

डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे

प्रतापराव जाधव

प्रताप सरनाईक

शंभूराज देसाई

निलेश राणे

मिनाताई कांबळी

गुलाबराव पाटील

दादाजी भुसे

उदय सामंत

संजय राठोड

संजय शिरसाट

भरतशेठ गोगावले

प्रकाश आबिटकर

आशिष जयस्वाल

योगेश कदम

दिपक केसरकर

श्रीरंग बारणे

धैर्यशील माने

संदीपान भुमरे

नरेश म्हस्के

रवींद्र वायकर

राजू वाघमारे

मिलिंद देवरा

दिपक सावंत

शहाजी बापू पाटील

राहुल शेवाळे

मनिषा कायंदे

संजय निरुपम

गोविंदा अहुजा

ज्योती वाघमारे

पूर्वेश सरनाईक

राहुल लोंढे

अक्षयमहाराज भोसले

समीर काझी

शायना एन.सी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com