Zeeshan Siddique News : झिशान यांनीही काँग्रेसविरोधात थोपटले दंड; म्हणाले, 88 हजार 514 सदस्यांनी..!

Youth Congress News : मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून झिशान सिद्दिकी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
Zeeshan Siddique
Zeeshan Siddique Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे आमदार पुत्र झिशान यांनीही आता काँग्रेसविरोधात दंड थोपटले आहेत. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर झिशान सिद्दिकी आक्रमक झाले असून, लवकर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तेही पक्षातून बाहेर पडणार, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. (Zeeshan Siddique News) 

बाबा सिद्दिकी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. झिशानही काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होती. त्यांनी काँग्रेसमध्ये काम करणार असल्याचे सांगत चर्चेवर पडदा टाकला होता. पण, त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना युवक काँग्रेसच्या (Youth Congress) अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे.  

Zeeshan Siddique
Zeeshan Siddique News : वडील राष्ट्रवादीत जाताच झिशान यांची हकालपट्टी; काँग्रेसकडून मोठा निर्णय

काँग्रेसने (Congress) झिशान यांच्या जागी अखिलेश यादव यांची नियुक्ती केली आहे, तर सुफियान मोहसीन हैदर हे कार्यकारी अध्यक्ष असतील. या फेरबदलानंतर झिशान यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. युवक काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच 88 हजारांहून अधिक मतांनी आपली निवड झाल्याचे सांगत त्यांनी लवकर याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हटलंय झिशान सिद्दिकींनी?

झिशान सिद्दिकी यांनी एक्स हँडलवर पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मला 88 हजार 514 मतांनी निवडून दिले आहे. युवक काँग्रेसच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले. मला हे पद लॉबिंग करून मिळालेले नाही. निवडणुकीत उच्चांकी मतदानातून माझी निवड करण्यात आली आहे.

संघटनेते बारा वर्षे काम करताना तीन निवडणुका लढवल्या. त्यानंतरही मला पदावरून हटवल्याची अधिकृत माहिती पक्षाकडून न मिळता बातम्या आणि सोशल मीडियातून मिळाली, हे दुर्दैवी आहे. मला मतदान केलेल्या 88 हजार 517 सदस्यांचा मी उत्तरदायी आहे. त्यामुळे लवकरच याबाबत भूमिका स्पष्ट करेन, असे झिशान यांनी म्हटले आहे.

R

Zeeshan Siddique
NCP Ajit Pawar : राज्यात 'महाभूकंप' होणार! शरद पवार गटासह काँग्रेस हादरणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com