Sharad Pawar Statement: ''माझं घर काँग्रेसच्या विचारांचं नव्हे तर...'' शरद पवारांचं मोठं विधान

NCP News : कुठं थांबायचं हे मला कळतं...
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Mumbai News: माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते. परंतु महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राजीव खांडेकर, गिरीश कुबेर उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनचा सोहळा पार पडला.या पुस्तकात शरद पवारांच्या 2015 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे. यावेळी शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Sharad Pawar
Sharad Pawar Big Statemenet: 'मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार; शरद पवारांची मोठी घोषणा

शरद पवार म्हणाले,माझं घर हे काँग्रेसच्या विचारांचं नव्हतं तर ते शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचं होतं. तसेच आयुष्यातला पहिला मोर्चा हा नववीत असताना काढला. माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते. परंतु महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाल्याचंही पवार यावेळी म्हणाले. (Political Short Videos)

मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. नववीत असताना पहिला मोर्चा काढला. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar
Arun Gujrathi : 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातील एक-एक ओळ...; अरुण गुजराथींनी सांगितला अनुभव

मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झालो. हळहळू मी पुण्यात काम केले. त्यानंतर मला मुंबईत काम करायचे सांगितले. मग महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांशी संपर्क येत होते. त्यावेळी अनेक मोठे नेते हॉटेलमध्ये उतरत नव्हते तर पक्षाच्या कार्यालयात किंवा कार्यकर्त्यांच्या घरी उतरत होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यांशी संपर्क आला. त्यावेळी युनोस्कोच्या संघटनेसाठी माझी निवड झाली असंही पवार यांनी सांगितले. (Latest Maharashtra News)

मला जपान, अमेरिकामध्ये जाण्याची संधी मिळाली. जपानला आम्ही गेलो तेव्हा जपानच्या पंतप्रधानच्या कार्यालयात काम करायला मिळाले. त्यावेळी जपानमध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रमाचे नियोजन आम्ही केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यलयात काम करण्याची संधी मिळाली.त्यावेळी दौरा सोडून मला परत बोलवले. मला विधानसभेला उभे राहण्याची संधी मिळाली. १९६७ मध्ये तिकीट मिळाले. निवडणूक सोपी नव्हती. परंतु अनेक वर्षे युवकांच्या चळवळीत काम केले. त्यानंतर विद्यार्थी चळवळीत काम केले. त्याचा फायदा झाला आणि मी निवडून आले.

Sharad Pawar
Mohit Kamboj News : राऊतांकडून 'तो' व्हिडीओ ट्विट आणि गंभीर आरोप,मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

जनतेनं मला ५६ वर्ष निवडून दिलं आहे. तसेच इतकी वर्ष मी कुठल्या न कुठल्या सभागृहाचा सदस्य राहिलो. अशी व्यक्ती देशात हयात नाही. पुन्हा निवडणूक लढवणार उभा राहणार नसल्याची घोषणाही पवार यांनी यावेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन देखील निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं. (Political Breaking News)

कुठं थांबायचं हे मला कळतं.राष्ट्रवादीकडून तसेच नवीन पिढीला संधी देणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. खासदारकीची ३ वर्ष राज्य आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याचंही पवार यांनी जाहीर केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com