Mohit Kamboj News : राऊतांकडून 'तो' व्हिडीओ ट्विट आणि गंभीर आरोप,मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Sanjay Raut Vs Mohit Kamboj : ''रात्री २ वाजता क्लबमध्ये जाणं ही माझी चूक होती...''
Mohit Kamboj News
Mohit Kamboj NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत हे नेहमीच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधत असतात. याचदरम्यान, राऊत आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात एका डान्सबारमध्ये भाजपचा एक नेता पहाटेपर्यंत धिंगाणा घालत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. हा व्हिडीओ मोहित कंबोज यांचा असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर आता कंबोज यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मोहित कंबोज(Mohit Kamboj)यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपावर भाष्य केलं. कंबोज म्हणाले, माझ्यावरील सर्व आरोप हे खोटे आहेत. माझ्यावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत. यापूर्वीही माझ्यावर आरोप केले जात होते. पण आता माझ्या कुटुंबियांना त्यात ओढले जात आहे. तसेच यावेळी त्यांनी रात्री २ वाजता क्लबमध्ये जाणं ही माझी चूक होती. क्लबमध्ये माझ्यासोबत माझी पत्नीही होती असंही कंबोज यावेळी म्हणाले आहेत.

काही लोक माझा पाठलाग करत होते. पहाटे साडेतीन वाजता सचिन कांबळेंनी माझा व्हिडीओ काढला असल्याचा आरोपही कंबोज यांनी यावेळी केला.

Mohit Kamboj News
Arun Gandhi Death News : मोठी बातमी: महात्मा गांधी यांचे नातू आणि लेखक अरुण गांधी यांचं निधन

काय आहे प्रकरण?

खासदार संजय राऊत(Sanjay Raut) आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्हिडिओमध्ये एक व्हीडिओ शेअर करुन तो एक भाजप नेता असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये सदरील व्हिडिओ पहाटे साडेतीन वाजताचा असल्याचं सांगून कायद्याचे धिंडवडे उडवले जात असल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत यांचा आरोप काय ?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्हिडीओ आणि पत्राद्वारे यांनी या धक्कादायक प्रकाराला वाचा फोडली होती. यावेळी राऊत म्हणाले, "पहाटे 3.30. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? शेवटपर्यंत पहा. पोलीस हतबल आहेत. हे तर काहीच नाही.. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलीस आयुक्तांना पाठवत आहे.

मी वाट पाहतोय आता पोलीस काय कारवाई करणार. हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे." हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र दिले आहे. त्यात त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या भाजप नेत्याचे नाव स्पष्ट केले.

Mohit Kamboj News
Ajit Pawar News : अजितदादांनी राखलं कार्यकर्त्याचं मन; थेट आले अन् झेरॉक्सच्या दुकानात काढली प्रत

राऊत म्हणाले की, "मुंबईत रेस्टॉरंट बार साधारण एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. हा बार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता. आतील धिंगाण्यामुळे बाहेर ट्रॅफिक जाम झाले होते. याबाबत माहिती देणाऱ्यास धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला. बारमध्ये मुलींच्या गराड्यात भाजपचे तरुण नेते मोहित कंबोज मद्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. त्यावेळी मोहित कम्बोज यांनी वर्दीतल्या पोलिसांशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने धमक्या दिल्या. त्यामुळे पोलीस हतबलतेने हा सर्व तमाशा अपमानित होऊन पाहत राहिले असा आऱोप करत या प्रकारामुळे भाजप नेत्यावर कारवाई करण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे.

'हा' गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई व्हावी

या घटनेचे हॉटेल व बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त करावे. कंबोज वारंवार फडणवीस, अमित शाह (Amit Shah) यांचा उल्लेख करून पोलिसांवर दाबव आणत होते. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहे. या बारमध्ये शनिवारी पहाटेपर्यंत अंमली पदार्थाचे सेवन, विक्री सुरु होती. त्यात भाजपचे कंबोज मद्यधुंद अवस्थेत गृहमंत्र्यांच्या नावाने पोलिसांना धमकावत होते. खार पश्चिमेचा बार कुणाचा आहे, त्याचा तपास करावा. पोलिसांना धमकावणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई व्हावी अशी मागणीही राऊत यांनी केली.

Mohit Kamboj News
Pune Crime News: बापरे! सायबर चोरट्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना केलं टार्गेट; बनावट फेसबुक अकाउंट बनवत...

महाराष्ट्रात नेमके कुणाचे राज्य?

फडणवीसजी आपले लाडके बँक बुडवे रात्री तीन वाजता डान्स बारमध्ये असतात. त्यांच्यासाठी पहाटेपर्यंत डान्स बार चालू ठेवण्याची सूट आपण पोलिसांना दिली आहे का? महाराष्ट्रात नेमके कुणाचे राज्य आहे? कायद्याचे की बँक बुडव्यांचे आणि डान्सबारवाल्यांचे?" असाी सवाल उपस्थित केला आहे.

(Ediited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com