Supriya Sule Indapur Tour : इंदापूरात खासदार सुप्रिया सुळे अॅक्टिव्ह! दोन आठवड्यात दुसरा दौरा, काय आहे कारण?

Indapur NCP News राष्ट्रवादी फुटीनंतर इंदापूरातील कोणते नेते सुळेंच्या दौऱ्यात सहभागी होणार?
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Indapur Political News : राष्ट्रावदी काँग्रेसमधून उपमुख्यमंत्री अजित पवार बाहेर पडल्याने बारामती लोकसभा मजबूत करण्यासाठी हलचाली सुरू केल्या आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापूर दौऱ्याचे नियोजन केले आहे. दोन आठड्यात दुसऱ्यांदा इंदापूरच्या दौऱ्यावर येत असल्याने सुळे लोकसभा निवडणुकीसाठी अॅक्टिव्ह झाल्याचे बोलले जात आहे. त्या सोमवारी इंदापूरमधील २२ पेक्षा अधिक गणपती मंडळाला भेट देवून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. (Latest Political News)

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गेल्या वर्षभरामध्ये ‘माझा मतदार संघ माझा अभिमान ’ या अभियानातंर्गत इंदापूरमधील बहुतांश गावे पिंजून काढली आहेत. दरम्यानच्या काळात त्यांचे दौरे थांबले होते. यानंतर त्या ११ सप्टेंबर रोजी इंदापूर तालुक्यात आल्या होत्या. त्यांनी भांडगावमधील शाळेला भेट देवून इतर गावातील लोकांशी चर्चा केली होती. यानंतरच १५ दिवसांतच पुन्हा सुळे सोमवारी तालुक्यात येणार आहेत.

Supriya Sule
Shivsena Disqualification News : सत्तासंघर्षावर बावनकुळेंना विश्वास! म्हणाले, 'बी प्लॅन'ची काही गरज नाही

यावेळी सुळेच्या दौरा भिगवणपासून सुरू होणार आहे. त्या दुपारी दोन वाजता भिगवणमधील गणपती मंडळाच्या भेटी घेणार आहेत. तसेच सायंकाळी इंदापूर शहरातील गणपती मंडळाला भेटी देतील. इंदापूरातील २२ पेक्षा अधिक गणेश मंडळाशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, दोन आठवड्यातच सुळेंचा हा दुसरा दौरा आहे. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याने त्या लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्यासाठी अॅटिव्ह मोडमध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Maharashtra Political News)

दौऱ्यामध्ये कोण सहभागी होणार?

इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. तालुक्यामध्ये २०१४ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार असून जिल्हाध्यक्षपद ही इंदापूर तालुक्याकडेच आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तालुक्यामध्ये दोन गट पडले आहेत. मात्र सर्व पदाधिकारी आम्ही पवार कुंटुबासोबत असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, यांच्यासह अनेक सहभागी झाले होते. आता सोमवारी होणाऱ्या दौऱ्यात कोण कोण सहभागी होणार, याकडे तालुक्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Supriya Sule
Malegaon Sakhar Karkhana : प्रचंड ताकद पणाला लावूनही योगेश जगतापांचा पत्ता कट; 'माळेगाव' अध्यक्ष निवडीत नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com