
पुणे : राज्य मंत्री मंडळात बदल करण्याचा अधिकार काँग्रेसच्या (Congress) हायकमांडला आहे. तो अधिकार मला नाही. मात्र, मी मंत्र्यांना कामाला लावू शकतो आणि ते मी लावणार आहे, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (ता.17 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत केले आहे. त्यांनी 10 मार्च नंतर महाराष्ट्रात मोठा बदल होईल, असे म्हटले होते. यावर त्यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. मला मंत्री मंडळात बदल करण्याचा अधिकार नाही. मात्र, मी त्यांना कामाला लावू शकतो, असे पटोलेंनी पुन्हा विधान केल्याने ते कॅाग्रेस मंत्र्याना कुठल्या कामाला लावणार याबाबतच्या चर्चा रंगायला सुरवात झाली आहे.
पटोले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषद भाजपवर आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. लोकसभेत महाराष्ट्र कॅाग्रेसवर कोरोना पसरवल्याचा आरोपांवरून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी कॅाग्रेसकडून भाजपनेत्यांच्या घरापुढे जाऊन आंदोलन करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला असून आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पत्र पाठवण्यात येणार आहेत. या पत्रावर इंग्रज अधिकारी शिवाजी महाराजांच्या दरबारात माफी मागायला आला या प्रसंगाचे छायाचित्र लावण्यात आले आहे. पत्रामध्ये मोदींना माफी मागायला सांगा,अशा आशयाचे पत्र उद्यापासून कॅाग्रेस कार्यकर्त्यांमार्फत शिवजयंती पर्यंत म्हणजे 19 फेब्रुवारी पर्यंत फडणवीसांच्या घरी पाठवण्यात येणार असल्याचे पटोलेंनी सांगितले.
राज्यात 10 तारखेनंतर बदल होणार या त्यांच्या वक्तव्यावर बोलतांना पटोले म्हणाले की, मी काय बोललो हे लोकांना समजले नाही. त्याला मी काय करू? मला सांगायचे होते की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मंत्र्यांना काम करता आले नाही. त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने त्यांना पुन्हा एकदा काम करता येणार आहे. त्यांना जनता दरबार भरवता येणार आहे. हा मोठा बदल येणार असून मंत्र्यांना लोकांचे प्रश्न सोडवता येणार आहे. या अर्थाने बदल येतील असे म्हटलो होतो, असे पटोलेंनी सांगितले.
दरम्यान, आसामच्या मुख्यमंत्र्यानी एका मातेचा अपमान केला असून याबाबत आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे पटोलेंनी सांगितले. तसेच, संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांची चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी म्हटले. याबरोबर, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सत्तेत येऊन दोन वर्ष झाली असून किमान समान कार्यक्रम, निधी वाटप, आमदार आणि मंत्री यांच्या तक्रारीबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा होणार असल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.