
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत (Loksabha) महाराष्ट्र कॅाग्रेसवर (Congress) कोरोना (Covid-19) पसरवल्याचा आरोप केल्यानंतर प्रदेश कॅाग्रेस आक्रमक झाली होती. त्यांच्याकडून भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलने करण्यात आली. यामुळे अनेक ठिकाणी वादही झाले. मात्र, आता कॅाग्रेसने आपल्या आंदोलनाची दिशा बदलली असून आता भाजप नेते व विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या घरी कॅाग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हाताने पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पटोले म्हणाले, कोरोना काळात देशातील इतर राज्यातुन अनेकजण कामासाठी महाराष्ट्रात येतात. त्यांना कोरोना काळात महाराष्ट्रावे आणि कॅाग्रेसने मदत केली आहे. मात्र, महाराष्ट्रावर कोरोना पसरवण्याचा आरोप करत लोकसभेत शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावला तर हात कलम केला जाईल, असा विचार शिवाजी महाराजांचा होता. तसेच, शेतकऱ्यांचे नुकसान केल्यानंतर इंग्रज अधिकारीही शिवाजी महाराज यांच्याकडे माफी मागाण्यासाठी आले होते. आता याच क्षणाचे छायाचित्राचे पत्र आम्ही कार्यकर्त्यांच्या हस्ते फडणवीसांच्या घरी पाठवणार असल्याचे पटोलेंनी सांगितले. हे आंदोलन उद्यापासुन (ता.18 फेब्रुवारी) सुरू करण्यात येणार असून शिवाजी महाराज यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे (ता 19 फेब्रुवारी) पर्यंत चालणार असल्याचे पटोलेंनी स्पष्ट केले. (Nana Patole News)
फडणवीसांच्या घरी पाठवण्यात येणाऱ्या पत्रावर इग्रज अधिकारी शिवाजी महाराजांच्या दरबारात माफी मागायला आला या प्रसंगाचे छायाचित्र आहे. या पत्रात म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दिल्लीपुढे आणि अहंकारी इंग्रजांपुढे झुकला नाही. याला इतिहास साक्षी आहे. तुमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा की, शेतकऱ्यांचा अपमान केला त्याबद्दल जशी देशाची माफी मागावी लागली तशी महाराष्ट्राच्या अपमानाबद्दल माफी मागणे चांगले राहील. दिल्लीच्या तख्तासमोर गुडघे टेकून महाराष्ट्राशी खेळू नका महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागुन तुमच्या पापाचे प्रायश्चित करा, असे पत्र महाराष्ट्रातून कॅाग्रेसचे कार्यकर्ते पाठवणार आहेत. असे पटोलेंनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.