किरीट सोमय्यांना अखेर एका सरपंचानं आणलं अडचणीत

रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावावर असलेल्या जागेवरून राजकारण तापले आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

अलिबाग : मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनीषा वायकर यांच्या नावावर असलेल्या जागेवरून राजकारण तापले आहे. या जागेवर 19 बंगले असल्याचा आरोप भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. अखेर यावर कोलेईच्या सरपंचानीच सोमय्यांना उघड पाडलं आहे. या जागेवर एकही बंगला नसून, गावात येऊन पाहणी करण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे.

सोमय्या यांनी मनीषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या कोलेई गावात 19 बंगले असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या जागेवर बंगले दिसले तर राजकारण सोडेन, असे खुले आव्हान राऊत यांनी सोमय्यांना दिले आहे. आता या वादात कोलेई गावच्या सरपंचांनेच उडी घेतली आहे. सोमय्यांचे सगळे आरोप त्यांनी खोडून काढले आहेत. कोर्लई ग्रामपंचायतीच्या हद्दीत मनीषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या जागेवर 19 बंगले नाहीत. भाजप नेते किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असा खुलासा कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी केला आहे.

Kirit Somaiya
सर्वोच्च न्यायालयाचा भाजप सरकारला दिलासा; स्थानिकांना नोकऱ्यांत 75 टक्के आरक्षण

मिसाळ म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या हद्दीत 9 एकर जागा अन्वय नाईक यांच्या नावावर होती. या जागेवर त्यांनी २००९ मध्ये रिसॉर्ट उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागिली होती. त्यावेळी या ठिकाणी 18 कच्ची घरे बांधण्यात आली होती. सीआरझेड कायद्यामुळे बांधकाम परवानगी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय रद्द करुन कच्चे बांधकाम पाडून टाकले होते. नंतर त्या ठिकाणी फळझाडांची लागवड करण्यात आली होती. ही जागा 2014 मध्ये त्यांनी मनीषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांना विकली. त्यांनी ही जागा घेतल्यावर तिथे कुठलेही बांधकाम केले नाही. आजही या जागेवर 18 बंगले अस्तित्वात नाहीत.

Kirit Somaiya
राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजप अडचणीत! आधी कार्यकारिणी बरखास्त नंतर बडतर्फीच्या नोटिसा

अन्वय नाईक यांनी आधी केलेल्या कच्च्या बांधकामांची ग्रामपंचायतीत नोंद होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने घरपट्टी वसूल केली होती. मात्र सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर ग्रामंपचायतीने तसेच प्रशासकीय यंत्रणांनी त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी कुठलेही बंगले अथवा घरांचे बांधकाम आढळून आले नाही. त्यानंतर आता या अस्तित्वात नसलेल्या घरांची नोंद काढून टाकण्यात आली. या प्रकरणी रश्मी ठाकरे यांनी कोणताही माफीनामा दिलेला नाही, असे सरपंच मिसाळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com