Nana Patole On Ajit Pawar : 'सकाळ माध्यम समूहा'तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीचा काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवार यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
आपल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील अनुभव कसा होता, यावरही भाष्य केले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात नाईलाजानेआपण काम केलं, असं पवार म्हणाले होते. याच विधानावर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे.
अजित पवार यांच्या या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. पटोले म्हणाले, "नाईलाज हा शब्द वापरण्यापेक्षा तुम्ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ नव्हतीच घ्यायची. तुम्ही पदावर बसून खदखद व्यक्त केली. त्यापेक्षा पदावर न बसता खदखद व्यक्त करायला हवी होती. अशा व्यक्तव्याची अपेक्षा आम्हाला नव्हती. प्रत्येक मुख्यमंत्री या राज्याला काही ना काही देऊन गेला. त्यामुळे असं वक्तव्य करणं चुकीच आहे. तुम्हाला तेव्हा काही गोष्टी आवडल्या नाहीत, तर त्याचवेळी त्यांनी बोलायला हवं होतं, असंही पटोले यावेळी म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार हे चार वेळा उपमुख्यमंत्रीपदी पदावर राहिलेले एकमेव नेते आहेत . उपमुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, 'माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही आमदारपदाचा ही अनुभव नव्हता. या दोघांच्याही काळात मी, उपमुख्यमंत्रीपदी म्हणून काम केले आहे. २०१९ च्या निकालानंतर महाविकास आघाडी तयार झाली, ठाकरेंच्या कार्यकाळात एकत्रितपणे चांगल्या प्रकारे काम केलं, पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळात सु्द्धा काम केलं."
अशा परिस्थितीत कधी कधी समाधानाने काम करावं लागतं, तर कधी नाईलाजाने. ठाकरेंच्या कार्यकाळात आनंदाने काम केलं, परंतु पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात मात्र आम्ही नाईलाजाने काम करावं लागलं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.