Ashish Shelar ON Uddhav Thackeray : ठाकरे कितीही विषारी बोलत असले तरी त्यांच्या घरी साप कोणी सोडू नये ; शेलारांचा टोला

Maharashtra Politics : सापाला पकडून त्याला जंगलात सोडण्यात आले.
Uddhav Thackeray, Ashish Shelar
Uddhav Thackeray, Ashish ShelarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Udhav Thackeray News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या वांद्रे येथील 'मातोश्री' बंगल्यात काल (रविवारी) विषारी साप आढळल्याने एकच खळबळ उडाली होती . सर्पमित्रांना बोलावून अखेर सापाला पकडण्यात आले आहे.

यावरून भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. "उद्धव ठाकरे कितीही विषारी बोलत असले तरी त्यांच्या घरी असे साप कोणी सोडू नये," अशी खिल्ली शेलारांनी उडवली आहे.

बंगल्याच्या आवारात पार्किंगमध्ये कोब्रा जातीचा विषारी साप आढळला होता. सापाची सुरक्षित सुटका करून त्याला पुन्हा योग्य ठिकाणी सोडण्यात आलं आहे. यामध्ये कोणालाही इजा, सर्पदंश झाल्याची माहिती नाही.

Uddhav Thackeray, Ashish Shelar
Loksabha Restores Rahul Gandhi's Membership: मोदींच्या विरोधात राहुल गांधी आता पुन्हा रान उठवतील..

"मातोश्री" बंगल्यात रविवारी दुपारी कोब्रा जातीचा विषारी नाग दिसला. वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोसिएशनला फोन करुन साप आढळल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सापाला पकडून त्याला जंगलात सोडण्यात आले. त्याची लांबी अंदाजे ४ फूट होती. काही महिन्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानीही साप निघाला होता.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Bjp flag
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Pune Police
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com