Dharashiv Political News: "सामान्य लोकांना जी स्वप्नं दाखवली ती मोदी सरकारला पूर्ण करता आली नाहीत. 2022 पर्यंत पक्की घर देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, बेरोजगारी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मूळ प्रश्न सोडून दुसर्या गोष्टी करीत आहेत. भारतीय जनता पक्षाचा जनाधार ढासळत चालला आहे," अशी टीका ठाकरे गटातील खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली.
"सिनेस्टारांना निवडणुकीत उभे करून निवडणुका जिंकता येतात, असे जर कुणाला वाटत असेल तर जनता फार हुशार झाली आहे. लोक त्याला उत्तर देतील," अशी टीका ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. आज शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर दुपारी होणार आहे. यावर त्यांनी निशाणा साधला.
ओमराजे म्हणाले, "पक्षातून फुटून जायचंय अन् तो पक्ष आमचा आहे असे म्हणायचे, असे म्हणण्याचा नवीन प्रकार सध्या सुरू झाला आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार त्यांचे हे वर्तन कुठेही टिकणारं नाही. त्याचा अंतिम निकाल निश्चित कायदा मोडणाऱ्या लोकांना भोगावे लागतील. अपेक्षित असलेला निर्णय येणारच आहे. फक्त आजचं मरण उद्यावर ढकलायची प्रक्रिया विधानसभा अध्यक्षांचा वापर करून चालू आहे."
"कायद्यात स्पष्ट तरतूद आहे की, पक्षातून फुटून जाणाऱ्या लोकांनी वेगळा गट स्थापन करणे अपेक्षित आहे किंवा दुसर्या पक्षात विलीन होणं अपेक्षित आहे. मात्र, यापूर्वी अशी कोणतीही प्रक्रिया पार पडलेली नाही," असे राजेनिंबाळकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.