नाना पटोले शरद पवारांना भेटणार; राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

Sharad Pawar| Nana Patole| Mahavikas Aghadi | संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्य विरुद्ध केंद्र संघर्ष शिगेला पोहचला आहे.
Nana Patole will meet Sharad Pawar today
Nana Patole will meet Sharad Pawar today

मुंबई : दिल्लीत महाविकास आघाडीतील (Mahavika Aghadi) मंत्र्यांची खलबलं झाल्यानंतर राज्यातही मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आज राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे अध्यक्ष आता शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या चर्चांना आणखी वेग आला.

केंद्रीय यंत्रणांचा राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर वाढणाऱ्या कारवाया हा चर्चेचा प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच महाविकासं आघाडीतील समन्वय, महामंडळ वाटप या विषयावरही चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Nana Patole will meet Sharad Pawar today
'कोण देत गृहमंत्र्याला 100 कोटी?' भुजबळांकडून देशमुखांची पाठराखण

अंमलबजावणी संचलनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तांवर कारवाई केली. त्यानंतर राज्य विरुद्ध केंद्र संघर्ष आणखीच चिघळला आहे. मात्र राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्याच दिवशी सांयकाळी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सर्वपक्षातील नेत्यांनीही हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या भेटीतील आकर्षण म्हणजे शरद पवारांच्या एका बाजूला संजय राऊत आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बसले होते.

त्यानंतर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चाही झाली. या दोघांच्या भेटीनंतर राज्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दूसरीकडे राज्यातील काँग्रेसच्या काही नाराज आमदारांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील काही मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आजच्या पवार-पटोले बैठकीमध्ये काय निर्णय होणार, याकडे आघाडीतील नेत्यांसह विरोधकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान या भेटीच्या पुर्वीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी यांवर प्रतिक्रीया दिली आहे. संजय राऊत हे शरद पवारांचे आहेत, मी पहिल्यापासूनच सांगत होतो आणि ते आता सिद्ध झालं. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर कारवाया झाल्या. पण त्यांच्यासाठी पवारांनी कधी पंतरप्रधानांची भेट घेतली नाही. म्हणजेच ते सरकारमधील इतर पक्षांसोबत दुजाभावाची करत असल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com