पंढरपूर : गृहमंत्र्याला कोण देतंय १०० कोटी?, मीही गृहमंत्री होतो', असे म्हणत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांची पाठराखण केली आहे. माजी गृह मंत्री अनिल देशमुख हेच वसुली प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा दावा ईडी(ed) ने कोर्टात केला आहे. याबाबत भुजबळ यांना विचारले असता त्यांनी ईडी कशा पद्धतीने अधिक दिवस तुरुंगात ठेवते हे सांगितले.
अनिल देशमुख आणि दुसरी कोणी व्यक्ती असे बोलले हे तिसरा चौथ्याला सांगतोय, कोणाला बोलले अनिल देशमुख? सचिन वाझेने सुद्धा चांदीवाल आयोगासमोर असेच सांगितलं की ते बोलले हे मी ऐकलं. पण मला तर ते काही बोलले नाहीत, पण काहीही करून मोठ्या रकमांचे आरोप करायचे आणि जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये ठेवायचे असा ईडीचा प्रकार सुरु आहे, असे आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.
मोठ्या रकमांचे म्हणजे 100, 500,1000 कोटींचे आरोप ठेवायचे. केस मजबूत करायची. मग जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये ठेवायचे हा इडीचा प्रकार सुरु आहे. न्यायालयाचा पण नाईलाज आहे. यावरून केस उभी राहते. ५० वर्षात असे पाहिले नाही. पण हे वसुलीचे पैसे कुठे आहेत. कोणाला मिळाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना महा विकास आघाडी मधून बाहेर पडली. लोकशाही मध्ये काही लोकांना पटते काही लोकांना पटत नाही. काही लोक येतात काही लोक जातात हे सुरू राहते. पण कोल्हापूर निवडणुकीवर याचा कोणताही होणार नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कोल्हापुरात ताकदीने काम करीत असून शिवसेनेतील किल्मिषेही आता दूर झाल्याचा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.