पटोलेंना 'अमजद खान' म्हणणं शुक्लांना पडलं महागात ; 500 कोटींचा मानहानीचा दावा दाखल

पटोले यांच्या नावासमोर अमजद खान असे लिहून त्यांचे फोन टॅप केले होते. बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांचे नाव अभिजित नायर असे दाखवले होते.
rashmi shukla, nana patole, Rashmi Shukla phone tapping case News
rashmi shukla, nana patole, Rashmi Shukla phone tapping case Newssarkarnama

नागपूर : कॉग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावापुढे 'अमजद खान' असे लिहून त्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (rashmi shukla)यांच्याविरोधात पटोलेंनी (nana patole)पाचशे कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल केला आहे. फोन टॅपिंगचे हे प्रकरण 2017-18 मध्ये करण्यात आल्याचा शुक्ला यांच्यावर आरोप आहे. रश्मी शुक्ला त्यावेळी पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. (Rashmi Shukla phone tapping case News)

नागपुरातील दिवाणी न्यायालयात पटोलेंनी शुक्ला यांच्याविरोधात हा मानहानीचा दावा केला आहे. मागील वर्षी विधिमंडळाच्या अधिवेशनात २०१५ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीमधील फोन टॅपिंग प्रकरणी प्रश्‍न उपस्थित झाला होता. याची पडताळणी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

rashmi shukla, nana patole, Rashmi Shukla phone tapping case News
जुन्नरचे नगराध्यक्ष पांडे राष्ट्रवादीच्या गळाला? बेनकेंच्या फेसबूक पोस्टमुळे शिवसैनिक नाराज

या समितीने २०१५ ते २०१९ या कालावधीमधील फोन टॅपिंगची पडताळणी केली होती. या समितीने राज्य सरकारकडे अहवाल दिला होता. सरकारने या अहवालाच्या आधारे पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. शुक्‍ला यांनी त्यांच्या कार्यकाळात बेकायदा पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचे या अहवालात म्हटलं आहे.

शुक्ला यांनी नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडे यांचे फोन टॅप केले होते. नाना पटोले यांच्या नावासमोर अमजद खान असे लिहून त्यांचे फोन टॅप केले होते. बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांचे नाव अभिजित नायर तर आशिष देशमुख यांचे नाव महेश साळुंके असे दाखवले होते.

rashmi shukla, nana patole, Rashmi Shukla phone tapping case News
मोठा निर्णय : राज्यात कामकाजाची भाषा मराठीच! राजभाषा विधेयक मंजूर

नाना पटोले असं म्हणाले होते की, 'राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना 2017-18 साली माझ्यासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपातील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते.'

फोन टॅपिंग (Phone Tapping)प्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla)या दोन वेळा कुलाबा पोलिस ठाण्यात उपस्थित राहिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या दूरध्वनीचे बेकायदा अभिवेक्षण (Phone Tapping) केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलिसांनी ५ मार्चला गुन्हा दाखल केला होता. (Rashmi Shukla phone tapping case News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com