Narhari Zirwal Meets Sharad Pawar: राजकीय घडामोडींना वेग; नरहरी झिरवळ पवारांच्या भेटीला

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 17 मे रोजी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक बोलवली आहे.
Narhari Zirwal - Sharad Pawar
Narhari Zirwal - Sharad PawarSarkarnama

Narhari Zirwal Meets Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक बोलवली आहे. 17 मे रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात ही बैठक घेण्यात येणार आहे. अशात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. झिरवळ यांनी वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. (Narahari Zirwal met Sharad Pawar at YB Chavan center)

दरम्यान, सत्तासंघर्षाचा निकाल ११ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस घडामोडी घडत आहेत. अशातच शरद पवार यांच्या उपस्थितीत १७ मे रोजी होणाऱ्या बैठकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरवली जाणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.

Narhari Zirwal - Sharad Pawar
Maval News : मावळातील गोपाळे,आवारेंच्या निर्घृण खुनांमागं 'हे' एकच आहे कारण; पोलिसांची मोठी माहिती

तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय़ानंतर आज ठाकरे गटाकडून झिरवळ यांना ७९ पानांचे निवेदन सादर केले आहे. यात न्यायालयाच्या निर्णय़ानुसार १६ आमदारांच्या अपात्रतेचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभु यांनी या निवेदनात केली आहे. (Sharad Pawar News)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतही हालचाली वाढल्या आहेत. आमदारांच्या अपात्रेवर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. (Narhari Zirval news)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com