व्होरा समितीच्या अहवालात कळेल दाऊदशी कोणाचे संबंध : नारायण राणेंचा नवा बॉम्ब

मुलांवर गुन्हा दाखल होताच केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले हा तर सत्तेचा दुरुपयोग
Narayan Rane
Narayan Rane sarkarnama

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर बेछूट आरोप केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) दोन्ही पुत्रांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्या वादात आता खुद्द राणे यांनी उडी घेतली आहे. केंद्र सरकारच्या व्होरा समितीचा निकाल राज्य सरकारने मागवावा, त्यात कळेल कोणाचे दाऊदशी संबंध आहेत, असा नवा बॉम्ब त्यांनी टाकला आहे. (Narayan Rane says vora committe report will reveals Dawood connection)

शरद पवार यांच्यावर आमदार नीतेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यावरून राणे बंधूंवर मुंबईतील आझाद मैदान पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.

Narayan Rane
पवारसाहेब; पुण्याचा विकास करू शकतो हा भ्रम तुम्ही पन्नास वर्षे जोपासलात

राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘जनता किंवा विरोधक यांच्या टीकेचे खंडन करणे, हे सत्तारूढ पक्षाचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणे, याला सत्तेचा दुरुपयोग म्हणतात. केंद्र सरकारच्या व्होरा समितीचा निकाल राज्य सरकारने मागवावा. त्यात कळेल कोणाचे दाऊदशी संबंध आहेत,’ असे सूचक विधान करून राणे यांनी नवा बॉम्ब टाकला आहे.

राणे हे गेल्या चार महिन्यांत अनेक कारणांमुळे गोत्यात आलेले आहेत. संतोष परब हल्ला प्रकरण, अधीश आणि नीलरत्न बंगल्यावरील कारवाई, दिशा सॅलियन प्रकरणातील चौकशीया मुळे राणे कुटुंबीय सध्या अडचणीत आहे. त्यात आता पवारांवर करण्यात आलेल्या टीकेची भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाला आहे. नीलेश राणे यांनी शरद पवार यांचे नाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी जोडले होते. शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो, असं खळबळजनक वक्तव्य नीलेश राणेंनी केले होते.

Narayan Rane
"फडणवीसांना यापूर्वी ६ वेळा नोटीस, दंग्याची गरज नाही"; गृहमंत्र्यांनी भाजपला सुनावले

आझाद मैदानात ९ मार्च रोजी काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान नीतेश राणे यांनी पवारांवर टीका केली होती. यावेळी त्यांची जीभ घसरली होती. याच कारणावरून नीतेश आणि नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात आता पोलीस कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com