Narayan Rane taunt Ajit Pawar : ''अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय..'' ; नारायण राणेंनी लगावला टोला!

Narayan Rane News : जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण आणि नारायण राणे यांनी असं का म्हटलं आहे?
Narayan Rane taunt Ajit Pawar
Narayan Rane taunt Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Narayan Rane latest statement : महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन नाट्यमय घडामोडी सुरू असतात, शिवाय कोणत्या ना कोणत्या मुद्य्यावरून राजकीय वातावरणही कायमच तापलेलं असतं. सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये तर आरोपप्रत्यारोप सुरू असतातच, मात्र कधीकधी मित्र पक्षातील नेत्यांमध्येही एकमेकांवर टोलेबाजी झालेली दिसते.

असाच काहीसा प्रकार आज समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यावर मीडियाशी बोलताना भाजपचे खासदार नारायण राणे यांनी त्यांना टोला लगावल्याचे दिसून आले आहे. अजित पवारांनी डोळे तपासणाच्या नवी व्यवसाय सुरू केला वाटतं, असं राणेंनी म्हटलं आहे.

Narayan Rane taunt Ajit Pawar
Narayan Rane : नारायण राणेंचा दिशा सालियनप्रकरणी धक्कादायक खुलासा; म्हणाले, 'उद्धव ठाकरेंनी दोनवेळा ..'

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी शनिवारी एका इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी म्हटले की, ‘’जो कुणी आपल्या मुस्लिम बांधवांकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस करेल, दोन गटांमध्ये संघर्ष निर्माणकरून कायदा व सुव्यवस्था बिघडवेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल, मग तो कोणीही असो त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, माफ केलं जाणार नाही.’’

तर अजित पवारांच्या या वक्तव्यावर नारायण राणेंना प्रतिक्रिया विचारण्यात आल्यावर त्यांनी म्हटले की, असं वाटतंय अजित पवारांनी डोळे तपासण्याची नवीन व्यवसाय सुरू केला आहे. तसेच, भाजप(BJP) अध्यक्ष जेपी नड्डा यांनी खासदारांना फिटनेसवर लक्ष्य देण्याचा सल्ला दिला आहे, त्यावर बोलताना राणे म्हणाले, माझे वय 65 वर्षांपेक्षा अधिक आहे. परंतु मी फीट आहे, माझे वजनही वाढलेले नाही. मी डायटवर लक्ष्य देतो, जास्त तेलकट पदार्थ खात नाही.

Narayan Rane taunt Ajit Pawar
Harshvardhan Sapkal : 'जिधर बम उधर हम', म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा धंगेकरावर 'बॉम्ब'

याशिवाय नागपूर हिंसाचारावर बोलताना नारायण राणेंनी(Narayan Rane) म्हटले की, पोलिस या प्रकरणी तपास करत आहे, पोलिसांना तपास करू द्यावा, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच. त्या आधी नारायण राणेंनी घेत दिशा सालियान हत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही केली होती.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com