Narayan Rane : नारायण राणेंचा दिशा सालियनप्रकरणी धक्कादायक खुलासा; म्हणाले, 'उद्धव ठाकरेंनी दोनवेळा ..'

Political News : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच दिशा सालियन प्रकरणावरुन गदारोळ सुरू झाला आहे. याप्रकरणी, मंत्री नितेश राणे यांच्याकडून थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले जात आहेत.
Uddhav Thackeray Vs Narayan Rane
Uddhav Thackeray Vs Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच दिशा सालियन प्रकरणावरुन गदारोळ सुरू झाला आहे. याप्रकरणी, मंत्री नितेश राणे यांच्याकडून थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यातच, दिशाचे वडिल सतिश सालियन यांच्या वकिलानेही आदित्य यांच्यासह काही सेलिब्रिटींवरही गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण जेव्हा झाले त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केले होते, असा दावा नितेश राणेंनी केला आहे. त्यानंतर या फोनवरून एकमेकांवर टीका केली जात असतानाच नारायण राणे यांनी मोठे विधान केले आहे.

दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंनी मला दोन वेळा फोन केला होता. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेण्याची विनंती मला केली होती. त्यावेळी मी त्यांना मी आदित्यचे नाव घेतले नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळीच तुम्हाला ही मुले आहेत, असेही उद्धव ठाकरे मला म्हणाले होते. तुम्ही जरा सहकार्य करावे, असेही ते मला म्हणाले होते, असे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

Uddhav Thackeray Vs Narayan Rane
Nagpur violence Update : नागपूर दंगलप्रकरणी मोठी अपडेट; एमडीपीच्या अध्यक्षानंतर कार्यकारी अध्यक्ष अन्‌ एका युट्यूबरला ठोकल्या बेड्या

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून या दोघांमध्ये आडवा विस्तवही जात नाही. त्यामुळे दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच शनिवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे.

Uddhav Thackeray Vs Narayan Rane
Nagpur Riots Update : फक्त मुस्लिमांवरच देशद्रोहाचे गुन्हे का? ठाकरेंचा सरकारवर निशाणा

ठाकरेंचा पहिला फोन मी मुंबईवरून घरी चाललो होतो, तेवढ्यात वांद्रे क्रॉस केल्यावर फोन आला. मिलिंद नार्वेकरचा फोन होता. म्हणाले, दादा साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हटलं, कोण साहेब. म्हणाले, उद्धवजी, त्यांच्याबरोबर मी आहे. ते गाडी चालवत आहेत. त्यांना बोलायचं आहे. मी म्हटलं, द्या. त्यांनी फोन घेतल्यावर मी म्हटलं जय महाराष्ट्र साहेब, बोला, ते म्हणाले, तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता. मी म्हटलं, मरेपर्यंत बोलणार. हे माझं उत्तर लगेच. तुम्हाला माहीत आहे मी थांबत नाही.

Uddhav Thackeray Vs Narayan Rane
Ajit Pawar : 'मुस्लिमांना जो डोळे दाखवणार त्याला सोडणार नाही', लक्षात घ्या, तुमचा भाऊ'; अजित पवारांनी पुन्हा फटकारले

त्यांनतर उद्धव ठाकरे म्हणाले, नाही साहेब मला हे बोलायचंय तुम्हाला मुलं आहेत. मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काही प्रेसला बोलता. आदित्यचं नाव घेता. माझी विनंती आहे की तुम्ही त्याचा उल्लेख करू नये. असं वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला. मी म्हटलं, उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा. एक तर मी अमूक ठिकाणी, अमूक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाही. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे म्हणतोय. आरोपींना अटक झाली पाहिजे हे म्हणतोय. त्यात तडजोड नाही, असे मी म्हणलो असे राणे यांनी यावेळी सांगितले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Uddhav Thackeray Vs Narayan Rane
MVA Leaders in Trouble : ऐन विधानसभेच्या तोंडावर महायुतीतून महाविकास आघाडीकडे उड्या मारलेले 'हे' नेते आले गोत्यात !

दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, दुसरा फोन हा कोविड असताना आला. त्यावेळी माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. माझी राज्य सरकारकडे एक परवानगी बाकी होती. तेव्हा त्यांचा फोन आला. तुम्ही फोन केला होता. मी म्हटलो हो. कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. उद्धव म्हणाले, साहेब ते तर मिळेलच. पण तुम्हाला सांगतो जरा तुम्ही, प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल. मी म्हटलं परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणता तसा मी उल्लेख केला नाही. पण एक मंत्री होता असे मी म्हणतोय. हे दोन फोन त्यांनी केले, असे राणे यांनी यावेळी सांगितले.

Uddhav Thackeray Vs Narayan Rane
Congress leader trouble : काँग्रेसच्या बड्या नेत्याचे टेन्शन वाढले; आमदारकी धोक्यात? कोर्टाने बजावला समन्स

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com