Narendra Modi Vs Sharad Pawar : PM मोदींचं शरद पवारांना चॅलेंज! 'राहुल गांधींकडून वचन घ्या की...'

Lok Sabha Election 2024 : गेल्यावेळी बहुमत चोरून काही लोकांनी सरकार बनवले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या विकासकामांवरही आपला राग काढला. मुंबईतील प्रत्येक विकासकाम त्यांनी लटकवले, रखडवले, भटकवले.
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama

Maharashtra Political News : स्वांतत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसने फक्त गरीबी हटावचा नारा दिला. प्रत्यक्ष कृती काही न करत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली. या दहा वर्षांत मात्र देशातील 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आणून ठेवली आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना Sharad Pawar काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरुन ओपन चॅलेंज दिले आहे. Narendra Modi Vs Sharad Pawar

राज्यात पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींची Narendra Modi जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच राहुल गांधीवरही निशाणा साधला. सध्या निवडणुकीमुळे राहुल गांधी हे शांत बसले आहेत. निवडणुका झाल्या की ते पुन्हा सावरकरांवर टीका करणे सुरू करणार आहेत, असे मोदींनी टीका केली.

राहुल गांधी Rahul Gandhi सावरकरांवर करत असलेल्या टीकेवरून पंतप्रधान मोदांनी शरद पवारांनाही एक आवाहन केले. ते म्हणाले, जे लोक रोज स्वातंत्र्यावीर सावरकरांवर टीकेची झोड उठवतात, त्या काँग्रेसवाल्यांसोबत उद्धव ठाकरे जाऊन बसले आहेत. त्यांनी शिवसैनिकांच्या विश्वासाला तडा दिला. आता माझे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला थेट आव्हान आहे की, त्यांनी राहुल गांधींकडून वदवून घ्यावे की कदापि ते स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलणार नाही, असे वचन घ्यावे. पण ते तसे करु शकत नाही, असेही मोदी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Narendra Modi
Narendra Modi Vs Congress : गरिबी, गरिबी, गरिबी...; मोदींच्या निशाण्यावर काँग्रेस, स्वातंत्र्यापासून इतिहासच काढला!

मोदांनी तत्कालीन महाविकास आघाडीवरही टीका केली. गेल्यावेळी बहुमत चोरून काही लोकांनी सरकार बनवले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या विकासकामांवरही आपला राग काढला. मुंबईतील प्रत्येक विकासकाम त्यांनी लटकवले, रखडवले, भटकवले. ते मुंबईतील लोकाशी दुश्मनी काढत होते. आता मी मुंबईला तिचा हक्क देण्यासाठी आलेले आहेत, अशी ग्वाहीही मोदींनी दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Narendra Modi
Raj Thackeray News : पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच राज ठाकरेंनी घेतलं पंडित नेहरुंचं नाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com