Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama

Narendra Modi : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा : महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे, २२५ प्रकल्प मंजूर!

Narendra Modi : काही प्रकल्पांवर काम सुरु आहे तर काही प्रकल्पांचे काम प्रस्थावित आहे

मुंबई : एकीकडे महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग पळवेले जात आहेत, अशी टीका विरोधकांडून होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. महाराष्ट्रात आता २ लाख कोटीं रूपयांचे २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. रोजगार मेळाव्याचे आज राजधानी मुंबईत येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरूणांना नियुक्तीपत्रांचं वितरीतल केले गेले. मोदींनी यावेळी संवाद साधत, आगामी काळात तरुणांसाठी नोकरी आणि रोजगारांच्या अधिक संधी निर्माण होतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

“अनेक नवे उद्योग, स्टार्टअप्स, लघु व मध्यम स्वरूपांच्या उद्योगांना सरकार सर्वतोपरी आर्थिक साहाय्य करत आहे, यामुळे युवक आणि युवतींनी या माध्यमातून आपली कुशलता दाखवण्याची संधी प्राप्त होईल. सरकारच्या या उचलेल्या पावलांमुळे नोकरी व रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यामध्ये दलित, आदिवासी, महिलांना समानतेच्या निकषानुसार रोजगाराच्या संधी प्राप्त होतील,” असेही मोदी म्हणाले

Narendra Modi
प्रकल्प गुजरातला गेल्याचा जाब मुख्यमंत्री शिंदेंना चार हजार पत्राव्दारे विचारला

“मागील आठ वर्षांमध्ये सुमारे ८ कोटी स्त्रिया 'सेल्फ हेल्प' ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. या माध्यमातून त्यांना आतापर्यंत साडे पाच लाख कोटी इतक्या निधीचे वितरण कले आहे. विशेष म्हणजे याच्याशी जोडल्या गेलेल्या महिला इतरही अनेक महिलांना रोजगार निर्माण करून देत आहेत,” असेही मोदी म्हणाले.

Narendra Modi
मिटता मिटेना ‘कडू’वटपणा; बच्चू कडू राणांच्या तलवारीचे वार छातीवर झेलायला तयार...

“देशामध्ये पायाभूत मुलभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये सरकारकडून गुंतवणूकीचा प्रयत्न होत आहे. यामुळेच आता तरूणांसाठी रोजगाराच्या नव - नव्या संधी प्राप्त होत आहेत. विशेष म्हणजे, एकट्या महाराष्ट्रासाठी २ लाख कोटी रूपयांचे गुंतवणूक असलेले २२५ प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे.

यापैकी काही प्रकल्पांवर काम सुरु आहे तर काही प्रकल्पांचे काम प्रस्थावित आहे. तर रेल्वे विभागासाठी ७५ हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्प यासाठी ५० हजार कोटींचा निधीची तरतूद करण्यात आल्याचे, मोदींनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com