Jayant Patil News : मोदींच्या हातात वळसेंचा हात अन् जयंत पाटील महायुतीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण!

Jayant Patil On NCP Crisis : जयंत पाटील यांचा अजित गटात प्रवेशाची नुसती औपचारिकता राहिली का?
Jayant Patil News :
Jayant Patil News :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटातील एक महत्वाचा बडा नेता लवकरच भाजपचे समर्थन करुन अजित पवार गटात जात असल्याची अशी चर्चा असतानाच, या नेत्याचा हा राजकीय प्रवास घडवून आणलाय तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच घडवून आणल्याचीही चर्चा आहे. कारण दोन दिवसांपूर्वीच्या पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात मोदींनी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना जवळ बोलावून चर्चा केली, त्यानंतरच या घडामोडींना वेग आल्याची चर्चा आहे.

Jayant Patil News :
Amit Shah on Co-operative sector: कार्यक्रमासाठी अमित शाहंनी पुण्याचीच निवड का केली? फडणवीसांनी सांगितलं कारण

वळसे पाटील आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्य सर्वश्रुत असल्याने, जयंत पाटलांचा महायुतीकडे येण्याचा हा प्रवास दिलीप वळसे पाटलांकडूनच केला जात आहे का? लवकरच जयंत पाटील आपल्या काही जवळच्या सहका-यांसोबत महायुतीत प्रवेश करीत करणार असल्याची चर्चा आहे.

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांचं लोकार्पण दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. पिंपरी-चिंचवड आणि पुण्याला जोडणाऱ्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या दोन मार्गिकांना मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मार्गिकांचं लोकार्पण झालं खरं, पण या कार्यक्रमात मोदी यांनी ज्या पध्दतीने वळसेंना आपली खुर्ची सोडून भर व्यासपीठावर जवळ बोलाविले व चर्चा केली त्यानंतरच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अजित पवार गटात जाण्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

अर्थात यावर जयंत पाटील यांनी कुठलाही ठाम नकार दिला नाही. यामुळे या घडामोडींवर शिक्कामोर्तब कधी होणार? याचीच उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. असली तरी या घडामोडींमधील खरे सेतू म्हणून थेट मोदींनी राज्याचे नवे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवडले व त्यांच्याकरवी जयंत पाटलांचा कार्यक्रम लावल्याची चर्चा पुणे जिल्ह्यातील राजकीय स्तरांत आहे.

१९९० पासूनची ही दोन पाटलांची फेविकॉल जोडी -

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे सन १९९० पासून प्रतिनिधित्व करुन अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशी महत्वाची मंत्रीपदे जयंत पाटील यांनी भूषविली आहेत, तर त्यांच्याच प्रमाणे दिलीप वळसे पाटील यांनीही सन १९९० पासून आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे सलगपणे प्रतिनिधित्व करुन गृहमंत्री, शालेय उच्च व तंत्रज्ञान मंत्री, अर्थमंत्री, सहकार मंत्री अशी महत्वाचे पदे भूषवून विधानसभाध्यक्ष म्हणूनही आपला कार्यकाल गाजविला आहे.

Jayant Patil News :
Danve On Kishor Patil News : आमदार किशोर पाटील सत्तार-बांगर यांच्या रांगेत बसण्याच्या लायकीचे..

दोन्ही पाटलांची ही संपूर्ण कारकिर्द शरद पवार यांच्याच कृपेने घडली असल्याने दोघेही एकमेकांच्या घनिष्ठ असल्याने वळसे पाटलांचा अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय दोन्ही पाटलांनी मिळून घेतल्याचीही चर्चा आहे. पर्यायाने वळसेंनंतर जयंत पाटील हेही महायुतीत जाण्याची जोरदार चर्चा असतानाच ही शिष्टाई वळसे पाटील यांच्या माध्यमातून थेट मोदींपुढे दोन दिवसांपूर्वी पुण्यात झाली आणि जयंत पाटलांच्या महायुती प्रवेशाची चर्चा लगेच राज्यभर सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com