Modi Vs Pawar : आधी मोदींची लोकांमध्ये हवा, नंतर मनातूनच उतरले; लोकसभेचं वारं नेमकं कसं फिरलं पवारांनी सांगितलं

Lok Sabha Election 2024 : आम्हा लोकांना सुरुवातीला वाटत होते, की ही निवडणूक आपल्याला सोपी जाणार नाही. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत सहभागी झाल्यानंतर प्रचार सुरू केला, तसा मोदींचा ट्रेंड कमी होत गेल्याचे दिसून आले.
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra ModiSarkarnama

Maharashtra Political News : राज्यात लोकसभा निवडणुकीचा अखेरचा म्हणजेच पाचवा टप्प्यातील प्रचार संपताना ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे विधान केले. लोकसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी देशात मोदींच्या बाजूने वातावरण होते. लोकांमध्ये त्यांची चर्चा होती. मात्र नंतर अशा अनेक गोष्टी घडल्या की वातावरण फिरले आणि महाविकास आघाडीला लोकांचे पाठबळ मिळत गेले, असे मतही पवारांनी व्यक्त केले. Modi Vs Pawar

एका खासगी मीडियाशी बोलताना शरद पवारांनी Sharad Pawar लोकसभा निवणुकीतील बदललेल्या हवेबाबत आपले निरीक्षण मांडले. ते म्हणाले, निवडणुकीच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी देशात मोदींच्या आधारावर लोकमत तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आले होते. लोकांमध्ये मोदींची चर्चाही होती. पण प्रचार सुरू झाला, त्यावेळी मोदींचा लोभ वाढू लागला, तशी लोकांतील मोदींबाबतची आस्था कमी होऊ लागली. परिणामी आधी 400 पार म्हणणारे आता खासगीत 240, 260, 280 असे बोलू लागले आहेत, असा दावा पवारांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या Narendra Modi चर्चेमुळे विरोधकांचा आत्मविश्वास कमी असल्याची कबुलीही पवारांनी दिली. ते म्हणाले, आम्हा लोकांना सुरुवातीला वाटत होते, की ही निवडणूक आपल्याला सोपी जाणार नाही. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत सहभागी झाल्यानंतर प्रचार सुरू केला, तसा मोदींचा ट्रेंड कमी होत गेल्याचे दिसून आले. आता मोदी सत्ता स्थापनेचा आवश्यक तो आकडाही गाठणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, भाजपच्या वतीने महायुतीला 400 हून अधिक तर एकट्या भाजपास 370 जागा मिळण्याचा दावा केला जात होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Narendra Modi
BJP Vs RSS : भाजपला आता 'आरएसएस'ची गरज नाही; जे.पी. नड्डा नेमके काय म्हणाले?

प्रचारात मोदींनी विरोधकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, हे लोकांना आवडले नाही असेही पवारांनी सांगितले. प्रचारात पंतप्रधान मोदींनी विरोधकांबाबत अशी काही विधाने केली त्याचा परिणाम त्यांच्या प्रतिमेवर झाला. मोदी मला भटकती आत्मा, तर उद्धव ठाकरेंना Uddhav Thackeray नकली शिवसेना म्हणाले. कारण नसताना हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मंगळसूत्र, जमीनीचे वाटप अशी भाषा केली. राहुल गांधींबाबत टिंगल टवाळीयुक्त विधाने केली. त्यांची अशा प्रकारची वक्तव्ये लोकांना आवडलेली नाहीत. आता त्यांचा 400 पारचा दावा फोल ठरत असल्याचेही पवार म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Narendra Modi
Swati Maliwal Case : केजरीवालांचे पीए विभव कुमार यांना न्यायालयाचा दणका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com