Naresh Mhase News : शेंदूर उडालेल्या दगडांनी 'सिंदूर'ची काळजी करू नये, उद्धव ठाकरेंवर शिंदेंच्या शिलेदाराची घणाघाती टीका

Naresh Mhase Uddhav Thackeray : नरेश म्हस्के यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 'माझं कुंकू, माझा देश' अभियानाची खिल्ली उडवली आहे.
Naresh Mhase Uddhav Thackeray
Naresh Mhase Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Naresh Mhase News : अबुधाबी येथे होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केला आहे. त्याविरोधात ते आंदोलन देखील करत आहेत. मात्र, खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंच्या आंदोलनावर टीका केली आहे. ते म्हणाले, मुळात अशिया चषकातील हा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वीही तणावाच्या वेळी काँग्रेस सत्तेत असताना दोन देशांमध्ये क्रिकेटचे सामने खेळले गेले आहेत. मात्र रोज पाकिस्तानचे गोडवे गात काँग्रेसची भूमिका मांडणाऱ्या व सत्तेसाठी हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाला या सामन्याला विरोध करण्याचा नैतिक अधिकार नाही. 'शेंदूर' उडालेल्या दगडांनी 'सिंदूर'ची काळजी करू नये.

पाकिस्तानबाबतच्या देशाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोवर दोन देशात सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊच शकत नाहीत, ही एनडीए भूमिका होती आणि आजही तीच भूमिका आहे. अशिया चषकात एक क्रिकेट सामना खेळल्याने त्यात बदल झाला असे म्हणणे चुकीचे आहे. दोन देशात क्रिकेट नाही तर कोणतेच सामने होत नाहीत. पाकिस्तानी खेळाडूंना अजूनही आयपीएलचे दरवाजे बंद आहेत. मात्र जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा (चषक) होतात तेव्हा पूर्वीही असे सामने झाले आहेत. विश्वचषकात आपण खेळलो असल्याची आठवण खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंच्या नेत्यांना करुन दिली.

आमच्याविरोधात उबाठाचे नेते रोज उर बडवत असतात. क्रिकेट सामन्याला विरोध करताना पंतप्रधानांबाबत बोलताना आपण काय शब्द वापरतो त्याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. आपली पात्रता, आपली कुवत ओळखून बोलले पाहिजे. ज्या लोकांविरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्या सोबत सत्तेत बसणे याला निर्लज्जपणा म्हणतात. हिंदुत्वाचा विचार सोडून सत्तेसाठी लाचारी स्वीकारण्याला निर्लज्जपणा म्हणतात. मुंबईच्या गुन्हेगाराला, बॉम्बस्फोटातल्या आरोपींना प्रचारात घेऊन फिरण्याला निर्लज्जपणा म्हणतात, अशी टीका नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर केली  

Naresh Mhase Uddhav Thackeray
Sharad Pawar Politics : मविप्र विद्यापीठाच्या वादात मोठा ट्विस्ट, विरोधकांपाठोपाठ आता सत्ताधारी पवारांच्या दरबारी

ठाकरेंना सिंदूरवर बोलण्याचा अधिकार नाही

'ऑपरेशन सिंदूर' बाबत संशय व्यक्त करणाऱ्या, देशाच्या जवानांनी गाजवलेल्या शौर्यावर शंका व्यक्त करणाऱ्या  लोकांना सिंदूर बाबत बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांनी सिंदूरचा अवमान केला आहे. आता निवडणुका आल्याने त्यांना सन्मान शब्द आठवला का? निवडणूक प्रचारात आयएसआयच्या हस्तकांना व बॉम्बस्फोटातल्या आरोपींना घेऊन फिरणाऱ्यांनी सिंदूर सारखे पवित्र शब्द उच्चारूही नयेत. पहलगामचा हल्ला झाला तेव्हा उद्धव ठाकरे हे परदेशात टूर करत होते. मात्र त्यानंतर एकाही पीडित बहिणीची साधी विचारपूसही केली नाही. आता ते 'माझं कुंकू, माझा देश..'  असे अभियान राबवणार आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांच्या कुवतीच्या पलिकडचा विषय आहे, अशी टिका खासदार  नरेश म्हस्के यांनी केली आहे.

Naresh Mhase Uddhav Thackeray
Aditya Thackeray News : पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट किती लाजिरवाणे ? खेळाडूंनो विचार करा, बहिष्कार टाका! आदित्य ठाकरेंचे आवाहन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com