Eknath Shinde Vs Aaditya Thackeray : 'ठाणे तर लांबच आहे, कल्याणमध्ये लढा!'; शिंदे गटाचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

Naresh Mhaske : आदित्य ठाकरे 50 ते 100 लोकांसमोर बोलतात. त्यांच्या सभांतील गर्दी तीच असते.
Aaditya Thackeray, Eknath Shinde
Aaditya Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : ठाण्यातील जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्याच मतदारसंघात लढण्याचे जाहीर आव्हान दिले होते. त्यावर आक्रमक झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाकरेंना प्रतिआव्हान दिले. ठाणे तर लांबच, कल्याणमध्ये येऊन लढा. आमच्या विरोधात सर्वांनी लढा, मग पाहा काय होतेय ते, असा इशाराच दिला. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर वरळीत लढा. वरळी सोडून शिवडी हा पर्याय का शोधता, असा टोलाही लगावत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे बालिश असल्याचा उल्लेख केला. (Eknath Shinde Vs Aaditya Thackeray)

ठाण्याच्या आनंद आश्रमात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मस्केंनी (Naresh Mhaske) ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, आदित्य ठाकरे हे कुठे येऊन आणि किती तर 50 ते 100 लोकांसमोर आव्हान करतात. ठाणे तर लांबच आहे, कल्याणमध्ये (Kalyan) लढा आमच्या विरोधात सर्वांनी लढा. याशिवाय जर तुमच्यात हिंमत असेल तर वरळीत लढा. शिवडीचा पर्याय का शोधला? त्यामुळे ते बालिश आहेत, असा घणाघात केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Aaditya Thackeray, Eknath Shinde
Sunil Tatkare : 'अजित पर्व' इतिहास बदलणार; सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले ?

तुमच्यासोबत किती लोक आहेत, ते चारही सभा घेतल्या त्या सभांमध्ये दिसले. नुसत्या मोठ्या गप्पा मारण्याचा प्रयत्न करू नये. त्या सभा म्हणजे नुक्कड सभा होत्या. झालेल्या चारही सभांमधील समोर तीच मंडळी दिसत आहे. आम्ही शिवसेनेत असताना ज्या जोशात आणि उत्साहात मीटिंग आणि आपल्या जाहीर सभा करायचो, ते चित्र आणि आताचे चित्र पाहावे, असे म्हणत मस्केंनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.

ठाण्यात शिवसेनेची ताकद ही एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) आहे की खासदार राजन विचारे किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे ते पाहावे. मग समजेल ताकद कुणाची आहे. तसेच लोक कोणाकडे आहेत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हेही समजून येईल, असे आवाहन करत म्हस्केंनी ठाकरेंना आव्हानच दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Aaditya Thackeray, Eknath Shinde
Madha Loksabha Constituency : पुतण्यासाठी विजयदादा उतरले मैदानात; अमित शाहांपाठोपाठ फडणवीसांनाही भेटले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com