Sunil Tatkare : 'अजित पर्व' इतिहास बदलणार; सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले ?

Ajit Pawar NCP News : लोकसभेत महायुती मिशन 45 समोर ठेवूनच निवडणुकीमध्ये उतरणार असून, आमच्या पद्धतीने प्रचार करणार आहे.
Sunil Tatkare, Ajit Pawar
Sunil Tatkare, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पक्ष आणि चिन्ह आहे. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी आता लोकसभेची राज्यभर जोरदार तयारी करत आहे. दरम्यान, आगामी निवडणुका समोर ठेवत पक्षवाढीसाठी राष्ट्रवादीची गुरुवारी बैठक पार पडली. आता इतिहास बदलणाऱ्यांचे 'अजित पर्व' आहे, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. (Sunil Tatkare News)

सुनील तटकरे म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) यांना बारामतीकर कुटुंब म्हणून स्वीकारतील. हे इतिहास बदलणाऱ्याचं अजित पर्व आहे. आगामी निवडणुकांत जितक्या जागा लढू त्या ताकदीने लढणार आहोत. त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करण्यासाठी बाहेर पडणार आहे. दरम्यान, या बैठकीत निडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Tatkare, Ajit Pawar
Radhakrishna Vikhe Latest News : पिसाळलेलं कुत्रं अन् काय-काय...; विखे पाटील संजय राऊतांवर भडकले, कारण काय ?

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) 45 जागा निवडून आणण्याचा विश्वासही तटकरेंनी व्यक्त केला. महायुतीत जागावाटपाबाबत कुठलाही वाद नाही. भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळतील, अशी चर्चा जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. ती केवळ अफवा आहे. येत्या लोकसभेत महायुती मिशन 45 समोर ठेवूनच निवडणुकीमध्ये उतरणार आहे, असेही तटकरेंनी (Sunil Tatkare) स्पष्ट केले.

Sunil Tatkare, Ajit Pawar
BJP News : खडसेंच्या घरवापसीसाठी विनोद तावडेंचे दिल्लीत लॉबिंग!

राज्यात पुन्हा भूकंप

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पाठोपाठ काँग्रेसही फुटीच्या मार्गावर आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी अजित पवारांकडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपत, तर मिलिंद देवरा शिवसेनेत सहभागी झाले आहेत. आता आमच्याकडे येणाऱ्या नेत्यांची संख्याही मोठी आहे, योग्य वेळी ते कळेलच, असे वक्तव्य करून तटकरेंनी राज्यात पुन्हा भूकंप होणार असल्याचे संकेतही या वेळी दिले.

जरांगेंना आवाहन

राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून १० टक्के आरक्षण दिले आहे. मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण देत सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला नाही. हे आरक्षण कायद्याच्या पातळीवर निक्की टिकेल, असा विश्वास व्यक्त करून तटकरेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange) आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Sunil Tatkare, Ajit Pawar
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला भाजपला जास्त जागा? किर्तीकर आक्रमक; केसरकर म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com