Chhagan Bhujbal On Nashik Bank : अडचणीतील नाशिक जिल्हा बँक वाचवण्यासाठी भुजबळांचा मोलाचा सल्ला; म्हणाले...

Dilip Walse Patil : "परवाना रद्द करण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी 'ॲक्शन प्लॅन' तयार करावा"
Chhagan Bhujbal, Dilip Walse Patil
Chhagan Bhujbal, Dilip Walse PatilSarkarnama

Mumbai News : नाशिक जिल्हा बँक तब्बल ९०० कोटी रुपयांनी तोट्यात असून नाबार्डने बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत अंतिम नोटीस पाठवली आहे. परिणामी अडचणीत आलेल्या या नाशिक बँकेला वाचवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. 'मोठ्या कर्जदारांकडून सक्तीने कर्ज वसुली करणे गरजेचे आहे,' अशी सूचना भुजबळांनी केली आहे. (Latest Political News)

नाशिक जिल्हा सहकारी बँकेबाबत सहकार मंत्र्यांच्या दालनात बुधवारी बैठक पार पडली. यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) बोलत होते. ते म्हणाले, "नाशिक जिल्हा सहकारी बँक ही देशातली एकावेळची नावाजलेली बँक होती. या बँकेचे आजही ११ लाख एवढे वैयक्तिक ठेवीदार आहेत. त्याचप्रमाणे एक हजारापेक्षा जास्त संस्थात्मक ठेवी आहेत. एकेकाळी या बँकेचा पत आराखड्यामध्ये दुसरा क्रमांक होता."

Chhagan Bhujbal, Dilip Walse Patil
Sambhajiraje News : शरद पवारांपाठोपाठ भुजबळांच्या मतदारसंघात संभाजीराजेंचा मेळावा

"दरम्यान, या बँकेची आर्थिक परिस्थिती बिघडली. सद्यस्थितीमध्ये ही बँक ९०९ कोटी रुपये एवढ्या मोठ्या तोट्यात आहे. बँकेला नाबार्डची बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत सूचित करण्याबाबतची अंतिम नोटीस मिळाली आहे. त्यामुळे बँकेची भांडवल पर्याप्तता वाढविणे गरजचे आहे. तसेच मोठ्या कर्जदारांकडून सक्तीची वसुली करण्याबाबत बँकेने अॅक्शन प्लॅन तयार करावा. कर्ज वसुली करताना लहान शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजीही बँकेने घ्यावी," असा सल्लाही भुजबळांनी दिला.

या बँकेवर किमान पुढील पाच वर्षे तरी प्रशासकाची नेमणूक कायम ठेवण्यात यावा. तसेच कर्जदारांना 'ओटीएस' (एकरकमी सेट्टलमेंट) करता येण्यासाठी काही प्रयत्न करता आले तर योग्य राहील, असेही भुजबळांनी सूचवण्याचा प्रयत्न केला. यावर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनीही काही सल्ले दिले. "बँकिंग परवाना रद्द करण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी जिल्हा बँकेने सर्वंकश ॲक्शन प्लॅन तयार करावा. राज्य सरकारने भाग भांडवलाबाबत हमी देऊन हा प्रस्ताव नाबार्डला सादर करावा, असे आदेश वळसे पाटलांनी दिला आहे."

Chhagan Bhujbal, Dilip Walse Patil
Congress Vs BJP Politics : उल्हास पाटलांची कन्या भाजपात जाणार? काँग्रेसने स्पष्टच सांगितले

या बैठकीला, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, तसेच सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, विभागीय सहनिबंधक संतोष पाटील, नाबार्डचे महाप्रबंधक रश्मी दरक, नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक प्रतापराव चव्हाण उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com