National Herald Case : कॉंग्रेस रस्त्यावर उतरणार ; सोनिया गांधी यांची आज चौकशी

आज काँग्रेसने सर्व प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षांना दिल्लीत बोलावले आहे.
Sonia Gandhi
Sonia Gandhi sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)या आज (गुरुवारी) नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) चौकशीसाठी हजर होणार आहेत. यापूर्वी, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने राहुल गांधींची सलग अनेक दिवस 51 तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे. (sonia gandhi latest news)

सोनिया गांधी यांना ईडीने जूनमध्ये चौकशीसाठी नोटिस पाठवली होती. मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. त्याला दिलासा देत ईडीने चौकशीची तारीख वाढवली. त्यानंतर ईडीने त्यांना 21 जुलैला हजर राहण्यास सांगितले. आज काँग्रेसने सर्व प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षांना दिल्लीत बोलावले आहे.

Sonia Gandhi
योगी सरकारच्या पहिल्या मंत्र्याचा राजीनामा ; 'लेटर बॅाम्ब' व्हायरल

तपास यंत्रणांच्या गैरवापराविरोधात काँग्रेस (Congress) संसदेसमोर रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे. पक्षाने इतर विरोधी पक्षांनाही एकता दाखवण्याची विनंती केली आहे. दरम्यान, पक्षाने वरिष्ठ नेत्यांना पक्षाच्या मुख्यालयात बोलावले आहे.

Sonia Gandhi
मुर्मू्ना मिळणार महाराष्ट्रातल्या १८५ ते १९० आमदारांची मते ; आज निकाल

ईडीच्या मुख्यालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वेळेवर भेट देणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) त्यांच्यासोबत पक्षाध्यक्षांना ईडी मुख्यालयापर्यंत सोडू शकतात, असे काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर पूर्णपणे नाकेबंदी केली आहे. कार्यालयाच्या दोन्ही गेटवर हेव्ही बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांसोबतच राखीव दलही ठेवण्यात आले आहे.

50 प्रश्नांच्या यादी

ईडीने सोनिया गांधी यांच्या चौकशीसाठी दोन सहायक संचालक आणि एका महिला सहायक संचालकांची नियुक्ती केली आहे. सोनियांच्या चौकशीसाठी ईडीने 50 हून अधिक प्रश्न तयार केले असल्याच समजतेय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com