योगी सरकारच्या पहिल्या मंत्र्याचा राजीनामा ; 'लेटर बॅाम्ब' व्हायरल

"मी दलित असल्याने मला अधिकाऱ्यांकडून योग्य वागणूक मिळत नाही,"
Dinesh khatik, Yogi Adityanath
Dinesh khatik, Yogi Adityanathsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) तीन मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसापासून सोशल मीडियावरुन सुरु आहे. त्यातील एका मंत्र्यानं राजीनामा दिल्याने योगी सरकारच्या मंत्रीमंडळात खळबळ उडाली आहे. (Dinesh khatik news update)

जलसंपदा राज्यमंत्री दिनेश खटीक (Dinesh khatik) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठवला आहे. ते काही महिन्यापासून नाराज होते. हस्तिनापुर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक आले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा राजीनामा व्हायरल होत आहे.

"मी दलित असल्याने मला अधिकाऱ्यांकडून योग्य वागणूक मिळत नाही," असा आरोप दिनेश खटीक यांनी केला आहे. "आपल्याला बैठकांचे निमंत्रण दिले जात नव्हते. आपल्यासोबत कोणत्याही बैठका घेतल्या जात नाहीत. फक्त गाडी देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे," असा आरोप खटीक यांनी केला आहे.

Dinesh khatik, Yogi Adityanath
मोठी बातमी : OBC आरक्षणासह राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा

"आतापर्यंत राज्यमंत्री म्हणून कोणतेही काम मिळाले नाही. मी दिलेल्या कोणत्याही आदेशावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच विभागाच्या योजनांची माहिती देखील देण्यात येत नाही," असे खटीक यांनी शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

जलविभागातील भष्ट्राचाराबाबत खटीक यांनी संबधिक अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, त्यांना कोणतीही माहिती मिळत नव्हती. "जलसंपदा विभागाचे सचिव यांना फोन केला तर ते आपले पूर्ण बोलणं न ऐकता ते फोन कट करीत असतं," असा आरोप खटीक यांनी केला आहे.

राजीनाम्याची प्रत त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राज्यपालांना पाठविली आहे. भाजपकडून खटीक यांच्या राजीनाम्याबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही. खटीक यांनी २०१७ मध्ये पहिल्यांदा हस्तिनापुर विधानसभा निवडणूक लढवली होती. यात ते विजयी झाले होते. दुसऱ्या विजयानंतर त्यांना योगी सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com