National Teachers Award 2025: चार शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, जगदाळे, शेख, जैन, पवार यांचा सन्मान

National Teachers Award 2025 Maharashtra Teachers: . हा पुरस्कार 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
Teacher Health Issues
Teacher Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली: शालेय आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, संशोधन आणि सामाजिक योगदानाद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या शिक्षकांना केंद्र सरकारकडून पुरस्कार देण्यात येतात. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर झाले आहे. आपल्या उत्कृष्ट योगदानामुळे महाराष्ट्रातील चार शिक्षकांनी हा प्रतिष्ठित सन्मान मिळाला आहे. हा पुरस्कार 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण

शिक्षण मंत्रालयाच्या स्कूल शिक्षा आणि साक्षरता विभागाने देशभरातील 27 राज्ये, 7 केंद्रशासित प्रदेश आणि 6 संस्थांमधून 45 शिक्षकांची निवड राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड येथील जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धपूर येथील डॉ. शेख मोहम्मद वक़ुइओद्दीन शेख हमीदोद्दीन आणि लातूर येथील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्समधील डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे यांचा समावेश आहे. या दोन्ही शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या समर्पित कार्यामुळे हा पुरस्कार मिळवला आहे.

निवड प्रक्रिया पारदर्शी आणि कठोर स्वरूपाची असून, ती जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन स्तरांवर 23 जून ते 20 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पार पडली. एकूण 45 पुरस्कार विजेत्यांपैकी 24 पुरुष आणि 21 महिला शिक्षकांचा समावेश आहे.

Teacher Health Issues
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर आज तोडगा निघणार? दोन नेत्यांच्या भेटीकडे लक्ष

उच्च शिक्षण

उच्च शिक्षण विभागाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी देशभरातील 21 शिक्षकांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईतील शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. नीलाक्षी जैन आणि बारामती येथील एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग महाविद्यालयातील प्रा. पुरुषोत्तम पवार यांचा समावेश आहे.

Teacher Health Issues
Yogi Adityanath: पंतप्रधान मोदी यांच्यानंतर कोण? योगी-शर्मा शीतयुद्ध सुरु

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार, उच्च शिक्षणातील प्रेरक आणि सक्षम प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी 2023 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली. निवड प्रक्रियेत अध्यापन परिणामकारकता, समाजाभिमुख उपक्रम, संशोधन, नवोन्मेष आणि प्रायोजित संशोधन यासारख्या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. डॉ. जैन आणि प्रा. पवार यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन आणि सामाजिक योगदानामुळे हा पुरस्कार प्राप्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com