Manoj Jarange Rally : भुजबळ, त्यांची समता परिषद चिल्लर, त्यांना काही उद्योग नाही; जरांगे आक्रमक

Manoj Jarange Slams Chhagan Bhujbal : छगन भुजबळांसह त्यांच्या समता परिषदेने आजच्या सभेच्या खर्चावर केलेल्या आरोपावर जरांगे उसळले...
Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Chhagan Bhujbal, Manoj Jarange Sarkarnama

Antarwali Sarati latest news : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांची रेकॉर्डब्रेक गर्दी अपेक्षित असलेली सभा अंतरवाली-सराटी (जि. जालना) येथे आज झाली. "आजची गर्दी तथा महासागर हा मराठा समाजाच्या शिकलेल्या लेकराच्या वेदना आहेत. शिकूनही या समाजाच्या लेकराचा आऱक्षणापायी नंबर हुकतो, त्यामुळे समाज अडचणीत आला, हे तो पाहू शकत नाही म्हणू्न तो इथे आला आहे," असे ते म्हणाले. "आज आम्ही एकी दाखवली, पण दहा दिवसांनंतर आरक्षण घेणारच," असा दावा त्यांनी केला.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Manoj Jarange Speech : २२ ऑक्टोबरनंतर जे होईल त्याला सरकारच जबाबदार; जरांगे संतापले...

छगन भुजबळांसह त्यांच्या समता परिषदेने आजच्या सभेच्या खर्चावर केलेल्या आरोपावर जरांगे उसळले. त्यांची चिल्लर अशी संभावना केली. त्यांना दुसरा उद्योग नसल्याचा टोला लगावला. त्यांचा विषयही काढू नका, असे ते म्हणाले.

सरकारने ३० दिवस मागितले होते. ती मुदत आज संपली. आम्ही आणखी दहा दिवस म्हणजे एकूण चाळीस दिवस देत आहोत. या कालावधीत सरकारने आरक्षण दिलेच पाहिजे, नाही ते त्यांना द्यावेच लागेल, कारण ते आमच्या हक्काचे आहे, असे जरांगे यांनी निक्षून सांगितले.

जरांगे म्हणाले, " केंद्र सरकार अन् राज्य सरकारने मराठ्यांचे हाल करू नये. आमचा ओबीसीत समावेश करा. दहा दिवसांपेक्षा अधिक काळ वाट पाहण्याची आमची तयारी नाही," असा सज्जड दम जरांगेंनी सरकारला दिला. "22 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आणि त्यानंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील."

Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Manoj Jarange Patil : वेगळा प्रवर्ग करून टिकणारं आरक्षण द्या! ; आरक्षणाशिवाय हटणार नाही, जरांगेंचा निर्धार

छगन भुजबळांवर टीका

जरांगे पाटील म्हणाले, "आम्हाला महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल, पण एनटी व्हीजेएनटीचा प्रवर्ग टिकला तसेच आरक्षण घेणार. 50 टक्क्याच्यावर आम्ही आरक्षण घेणार नाही."

मनोज जरांगेंनी आपल्या भाषणात सरकारवर टीकास्त्र डागले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी गंभीर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समज द्यावी, असे सांगत आरक्षणाची पुढील दिशा २२ ऑक्टोबरला ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By : Mangesh Mahale

Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Manoj Jarange Rally : जरांगेंना अटक करा; गृहविभागाला सदावर्तेंचे पत्र, पोलिस अलर्ट...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com