Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना कॉर्नर करण्यासाठी भाजप मंत्र्याचा डाव; प्रशासक काळातील सगळा 'कच्छाचिठ्ठा' काढण्याचा प्लॅन

BJP Ganesh Naik statemen BJP Shiv Sena Rift : नवी मुंबई महापालिकेत प्रशासक काळातील विकासकामांचे लेखापरीक्षण करण्याची मागणी पुढे येत असून, यामुळे भाजप-शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंभोवती राजकीय तणाव वाढताना दिसत आहे.
Ganesh Naik vs Eknath Shinde
Navi Mumbai Municipal Corporation after restoration of elected body, as BJP leaders signal an audit of six-year administrator rule, intensifying political tensions with Shiv Sena leadership.Sarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai Municipal Corporation : नवी मुंबई महापालिकेवर लोकप्रतिनिधींची सत्ता अखेर स्थापन झाली आहे. महापालिकेवर गेली सहा वर्षे प्रशासक राजवट होती. या काळात केलेल्या विकासकामांचे लेखापरीक्षण (ऑडिट) केल्यास गैर काय, असा टोला नवनिर्वाचित उपमहापौर दशरथ भगत यांनी लगावला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी याआधीच सभागृहातील कामांची पडताळणी करणार असल्याचा पुनरुच्चार भगत यांनी केला.

भगत यांच्या वक्तव्यामुळे पहिल्याच दिवशी शिवसेनेतील नेत्यांमध्ये चर्चेला तोंड फुटले आहे. नवी मुंबई महापालिकेतील कामांवरून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांवर वारंवार टीका केली आहे. यामुळे दोन्ही पक्षांतील नाते ताणले गेले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत महायुतीखाली निवडणूक होऊ शकली नाही.

महापालिकेत शिंदे यांच्या आदेशामुळे होत असलेल्या कामांवर अनेकदा नाईक यांनी प्रश्न उपस्थित करित पाणीचोरी होत असल्याचा आरोप केला आहे. पाण्यासारख्या नवी मुंबई महापालिकेच्या अनेक सुविधांमध्ये वाटमारी केली जात असल्याचे वक्तव्य नाईक यांनी केले आहे. त्याच वक्तव्यांचा धागा धरून दशरथ भगत यांनी प्रशासक राजवटीत केलेल्या कामांचे लेखापरीक्षण करणार असल्याचे संकेत दिले.

जनतेची मागणी!

भगत यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकारांसोबत चर्चा करताना, सभागृहात यापूर्वी झालेल्या कामांची पडताळणी केल्यास गैर काय, असा प्रश्न उपस्थित केला. गणेश नाईक यांनी याआधीदेखील कामांची पडताळणी करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जेव्हा सभागृहात येऊन कामांची तपासणी करतात, तेव्हा ही जनतेची मागणी आहे. त्यानुसार काम केले जात असेल, तर काही हरकत नाही, असे भगत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com