Navi Mumbai: एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध; 14 गावांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

Navi Mumbai 14 villages dispute news : लोकसभा निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Navi Mumbai 14 villages dispute news
Navi Mumbai 14 villages dispute newsSarkarnama
Published on
Updated on

Dombivli, 11 March 2025: वनमंत्री गणेश नाईक सध्या त्यांच्या जनता दरबारामुळे चर्चेत आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात त्यांनी जनता दरबार घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान दिले आहे. त्यानंतर पुन्हा ते चर्चेत आले आहेत याला निमित्त आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं पत्र.

लोकसभा निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाच्या निर्णयाच्या विरोधात आता वनमंत्री गणेश नाईक यांनी दंड थोपडले आहे. या गावांच्या समावेशाला विरोध केला आहे. याबाबत नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. नाईकांच्या पत्रामुळे 14 गावांचे भवितव्यांचे काय असा प्रश्न या गावातील नागरिक विचारत आहेत.

तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापुर्वी शासन निर्णय काढून या गावाबाबतची ही मागणी पुर्ण केली. आता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधील १४ गावे नवी मुंबई महापालिका हद्दीतून वगळावित, असे पत्र नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या गावांच्या विकासाचा भार नवी मुंबईकर करदात्यांनी का सोसावा, असा सवाल नाईकांनी पत्रात उपस्थित केला आहे.

Navi Mumbai 14 villages dispute news
Satish Bhosale Khokya : फरार असलेल्या खोक्या व्हिडिओतून पहिल्यांदाच बोलला; पळून का गेला? सुरेश धसांशी नातं काय?

नवी मुंबई महापालिकेवर 14 गावांच्या समावेशामुळे सहा हजार कोटी रुपयांच्या आर्थिक भार पडणार असल्याचे नाईक यांचे फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. एकेकाळी वाढीव मालमत्ता कराच्या प्रश्नावर नवी मुंबई महापालिकेतून बाहेर पडल्याने ही गावे समस्यांच्या गर्तेतत सापडली आहेत. यातून बोध घेऊन ग्रामस्थांनी आमच्या गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा अशी मागणी लावून धरली होती.

ही आहेत ती 14 गावे...

नावाळी, वाकळण, बाम्मली,दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू,नारीवली, भंडार्ली, उत्तर शीव, बाळे, नागांव, गोठेघर अशी गावांची नावे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com