Navneet Rana met Devendra Fadnavis : 'मी 100 टक्के देशपातळीवर..' ; फडणवीसांच्या भेटीनंतर नवनीत राणांचं सूचक विधान अन् चर्चांना उधाण!

Navneet Rana and Fadnavis Meeting News : लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यांची भेट घेतली.
Navneet Rana
Navneet Rana Sarkarnama

Amravati Loksabha Election Result and bjp Navneet Rana : लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या भाजपच्या नवनीत राणा यांनी, निकालानंतर बुधवारी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी फडणवीसांशी नेमकी काय चर्चा केली आणि आगामी काळात त्यांची काय कार्य पद्धती असणार आहे, याबाबत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

यावेळी नवनीत राणांनी त्या नक्कीच देशपातळीवर काम करणार आहेत, असं ठामपणे सांगितल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत नवनीत राणा(Navneet Rana) म्हणाल्या, 'लोकसभा निवडणूक झाल्यापासून आम्ही भेटलो नव्हतो. कशा पद्धतीने निवडणूक झाली याबाबतची माहिती देण्यात आली आणि त्यासंदर्भात त्यांच्याशी बोलणं झालं. लोकसभा निवडणुकीनंतर भेट न झाल्याने भेटायला आलो होतो.'

तसेच 'मी भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. त्याचसंदर्भात आगामी काळात एक कार्यकर्ता म्हणून कशापद्धतीने काम करावं लागेल, विधानसभेसाठी कशा पद्धतीने काम करायचं आहे. या सगळ्याबाबत फडणवीसांशी चर्चा झाली. पक्षाची कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी भाजपचा दुपट्टा गळ्यात घेतला, तर मला वाटतं की मी त्याच्याशी नक्कीच इमानदार राहील.' असंही राणा यांनी सांगितलं.

Navneet Rana
Navneet Rana : मी हारूनही जिंकले! नवनीत राणा असं का म्हणाल्या...

याशिवाय 'मला असं वाटतं की मी पक्षाची कार्यकर्ता आहे आणि माझं कर्तव्य आहे की निवडणुकीत कशामळे माझ्या जनतेने अमरावतीत मला थांबवलं, ते सांगणं मला खूप आवश्यक होतं. याशिवाय कुठे काय झालं, माझ्याकडून काय चूक झाली? की माझ्या अमरावतीच्या जनतेनेच मला एक अपक्ष खासदार म्हणून संसदेत पाठवलं होतं आणि त्यानंतर जेव्हा आताची निवडणूक मी लढले तर मला थांबवलं. या गोष्टीवर चर्चा झाली.

देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis) माझे नेते आहेत, त्यांच्याशी भेटून मला बरं वाटलं. निकालानंतर आज मी त्यांची भेट घेतली आहे.' अशी माहिती नवनीत राणांनी मीडियाला दिली.

Navneet Rana
Mahayuti News : अजितदादांचे विदर्भातील कार्यकर्ते अस्वस्थ; विधानपरिषदेसाठी मुंबईत घिरट्या...

याचबरोबर 'मी माझं कर्तव्य इमानदारीने पार पाडलं. मी मोदींसाठी(PM Modi) अमरावतीमधून एक जागा निवडून देवू शकलो नाही, ही आयुष्यभर माझ्या मनात नक्कीच खंत राहील. आगामी काळात पक्षाची कार्यकर्ता म्हणून इमानदारीने काम करत राहणार, आमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेवून आम्ही या मैदानात आहोत.

मला नाही वाटत की जोश कधी कमी होईल, जे इमानदार असतात ते फक्त लढणं जाणतात.' असं म्हणत नवनीत राणा यांनी आपली आागमी काळातील कार्यपद्धती कशी असणार हे सांगितलं.

नवनीत राणांचं सूचक विधान -

'मी देशपातळीवर जाऊन काम करणार आहे. माझी कार्यकर्ता म्हणून जिथे जिथे गरज असेल, जिथे जिथे मला वाटले की पक्षाला आपण मदत करू शकतो, तिथे जाऊन मी नक्कीच काम करणार आहे. माझे नेते जे मला सांगतील तो आदेश मानून मी काम करणार आहे. मी शंभर टक्के देशपातळीवर काम करणार आहे.' असं राणा म्हणाल्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com