मलिक-देशमुख जेलमध्ये एकत्र डबा खातील ; मलिकांचे वादग्रस्त व्हिडिओ समोर आणणार

नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे. त्यांनी अनेक बांगलादेशी मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलले होते
mohit kamboj
mohit kambojsarkarnama

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांना ईडीने अटक केल्यानंतरही भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी मलिकांवर गंभीर आरोप करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. मोहित कंबोज (mohit kamboj) यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मलिकांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

मोहित कंबोज म्हणाले, ''नवाब मलिक आधी समाजवादी पार्टीत होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीत आले. १९९३ च्या बॅाम्बस्फोटात नवाब मलिक यांचे धागेदोरे तर जोडले गेले नाहीत ना ? याचा तपास व्हायला हवा. नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे. त्यांनी अनेक बांगलादेशी मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलले होते,''

''महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या भावना समजून घ्यायला हव्यात, राजकारण करू नये. जे राज्याचे आणि देशाचे शत्रू आहेत, असे लोक आपल्यासोबत आहेत याचा विचार महाविकास आघाडी सरकारने केला पाहिजे,'' असे कंबोज म्हणाले.

''मलिकांनी तीन हजार कोटींचा भष्ट्राचार केला आहे. ही संपत्ती त्यांनी गुन्हेगारी जगताच्या संबधातून कमावली आहे. वरळी, वांद्रेतील घर असो, किंवा कुर्ला येथील शाळा असो याचा तपास एजन्सीने केला पाहिजे. भष्ट्राचाराच्या विरोधात आम्ही लढाई लढू,''असे कंबोज म्हणाले.

''काल काही माझे कार्यकर्ते आले आणि त्यांनी मला डमी तलवार दिली. पोलीस आले आणि माझ्याकडून डमी तलवार घेऊन गेले. आज माझ्यावर गुन्हा दाखल झाला. मी याबाबत कोर्टात जाणार आहे,'' असे कंबोज यांनी सांगितले.

कंबोज म्हणाले ''ज्या प्रॉपर्टीचा काल ईडीचे तपास केला त्यात डान्सबार चालत होता. एक मंत्री डान्स बार चालवत होता. बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायात टाकण्याचे काम नवाब मलिक करीत होते. माझ्याकडे तसे व्हिडिओ आहेत. ते मी व्हिडिओ समोर आणणार आहे. अंडरवर्ल्डशी संबंध, वेश्या व्यवसाय आणि ड्रग्सची संबंध त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा,''

mohit kamboj
मलिकांच्या अटकेनंतर कंबोजांना तलवार दाखवणं पडलं महागात

''ड्रग्स प्रकरणी मुंबई पोलीस एसआयटीची चौकशी करण्यासाठी सक्षम नसतील तर हा तपास पुढे गेला पाहिजे. पूजा ददलानी सोबत काय व्यवहार झाला याची चौकशी व्हायला हवी,'' अशी मागणी यावेळी कंबोज यांनी केली. ''नवाब मलिक आणि अनिल देशमुख (anil deshmukh)एकत्र डबा खातील. सलिम जेलमध्ये गेले आहेत, जावेद बाकी आहे,'' असा टोला कंबोज यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com