फडणवीसांच्या आशीर्वादाने ड्रग्जचा खेळ; मलिकांचा खळबळजनक आरोप

फडणवीसांची सीबीआय किंवा न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी मलिकांनी केली आहे.
Amruta Fadnavis with Jaydeep Rana.
Amruta Fadnavis with Jaydeep Rana.
Published on
Updated on

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून (Cruise Drug Case) आता राज्यातील राजकारण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून दररोज नवनवे आरोप केले जात आहे. रविवारी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व नीरज गुंडे (Niraj Gunde) यांच्या संबंधांविषयी आरोप केले होते. आता थेट एका ड्रग्ज पेडलरशी त्यांचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे.

फडणवीस यांच्याकडून ड्रग्ज रॅकेटला संरक्षण मिळत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला असून याची सीबीआय किंवा न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मलिक यांनी सोमवारी सकाळी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये असलेली व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. जयदीप राणा (Jaydeep Rana) असं या व्यक्तीचे नाव आहे. निशांत वर्मा या राजकीय विश्लेषकांनीही हा फोटो ट्विट केला आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच अटक कऱण्यात आली आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

Amruta Fadnavis with Jaydeep Rana.
मलिकांनी सांगितलं, वानखेडे अन् शबाना कुरेशी यांचा घटस्फोट का झाला?

राणा साबरमती तुरूंगात आहे. ड्रग्जच्या प्रकरणात त्याला अटक कऱण्यात आली. त्याचे संबंध फडणवीस यांच्याशीही आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नींनी नदीवर एक गाणं तयार केले होते. त्यात सोनू निगम व अमृता यांनी गाणं गायलं होतं. त्यात फडणवीस व तत्कालीन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनीही अभिनय केला होता. त्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होता, असे मलिक यांनी सांगितले.

सार्वजनिक जीवनात कोण कुणाच्या सोबत फोटो काढतं, यावर आपला काहीच आक्षेप नाही. पण एक ड्रग्ज पेडलर मुख्यमंत्र्यांचा अभिनय असलेल्या गाण्याला फायनान्स करतो, यावरूनच सर्व स्पष्ट होतो. देवेंद्रजींचे जयदीप राणाशी असलेले नाते घनिष्ठ आहे. गणपती दर्शनासाठी राणा व फडणवीस एकत्र होते. महाराष्ट्रातील ड्रग्जच्या मोठ्या साखळीशी याचा संबंध आहे. भाजपचे लोक का सुटत आहेत. त्यांच्या नाकाखाली ड्रग्जचा धंदा सुरू होता. भाजपात काही ड्रग्जशी संबंधित लोक आहेत. डॅग्जचा खेळ कुठे ना कुठे देवेंद्रजींच्या आशिर्वादाने सुरू होता.

ड्रग्ज रॅकेटला देवेंद्रजी संरक्षण देत आहेत. याची केंद्र सरकारने न्यायालयीन चौकशी केली पाहिजे. ड्रग्ज प्रकरणी सीबीआय तपास करू शकते. मी त्यांच्या फोटोंवर प्रश्न उपस्थित करत नाही. त्या गाण्याच्या फंडिंगवर प्रश्न आहे. महाराष्ट्र, आघाडी सरकारला बदनाम करायचे, बॉलीवू़डला बदनाम करायचे हे सर्व दोन वर्षांपासून खेळ सुरू आहे. देवेंद्रजी हे कटकारस्थान रचत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com