मलिकांनी सांगितलं, वानखेडे अन् शबाना कुरेशी यांचा घटस्फोट का झाला?

समीर वानखेडे यांच्या भगिनी जास्मिन वानखेडे यांचाही घटस्फोट झालेला आहे.
Sameer Wankhede
Sameer Wankhede
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शनिवारी ट्विटरवरून एक फोटो शेअर केला होता. हा व्यक्ती कोण आहे, समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशी त्याचा काय संबंध आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. त्यामुळे या फोटोविषयी उत्सुकता वाढली होती. अखेर मलिक यांनी रविवारी या फोटोचे गुपित उघड केले असून समीर वानखेडे यांच्या घटस्फोटावरही ते बोलले आहेत.

मलिक यांच्याकडून आपल्या कुटुंबीयांवर सातत्याने आरोप केले जात असल्याची तक्रार एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केली आहे. आपल्याला बदनाम केले जात असून मागासवर्गीय असल्याने त्रास दिला जात असल्याचेही वानखेडे यांनी म्हटलं आहे. पण त्यानंतरही मलिक यांच्याकडून शनिवारी वानखेडे यांच्याशी संबंधित एका व्यक्तीचा फोटो ट्विट करण्यात आला.

Sameer Wankhede
आमदार गोरेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीची भावाशी हातमिळवणी?

मलिक यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले, की फोटोतील व्यक्ती समीर वानखेडे यांचा मेव्हणा आहे. तो युरोपात राहतो. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचे वडिल मुस्लिम आहेत. बोगस दाखल्यावर त्यांनी नोकरी मिळवली. 2015 पासून या लोकांनी ओळख लपवण्यास सुरूवात केली. फेसबूकवर ह्यांची नावे दाऊद वानखेडे होती. हळूहळू डी.के. वानखेडे, ज्ञानदेव लिहिण्यास सुरूवात केली. यास्मिनचे जास्मिन केले. घरात सून व जावई सोबत राहिले तर मुस्लिम असल्याचे समोर येईल म्हणून त्यांच्याकडून सुटका करून घेतली पाहिजे, या भूमिकेतून घटस्फोट घेण्यात आला. आज हा जावई युरोपात आहे, असंही सांगत मलिक यांनी पुन्हा एकदा वानखेडे हे मुस्लिमचं असल्याचं सांगितलं.

यास्मिन वानखेडे यांचे अब्दुल अझिज खान यांच्यासोबत लग्न झाले होते. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या निकाहनाम्यावर अब्दुल अझीज यांचे नाव आहे. मलिक यांनी टि्वट केलेला फोटो हा अब्दुल अझिज यांचा आहे. यास्मिन वानखेडे यांनी ओळख लपविण्यासाठी अब्दुल अझिजसोबत घटस्फोट घेतल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

Sameer Wankhede
सोमय्यांचा दिवाळीनंतर धूमधडाका; तीन मंत्री अन् जावयाचे टेन्शन वाढले

राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरूण हलदर यांनी वानखेडे यांना क्लिनचिट दिली आहे. ते मुस्लिम नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावर बोलताना मलिक यांनी हलदर यांच्यावर टीका केली. हलदर यांची नेमणूक संवैधानिक पदावर झाल्यानंतर तक्रारीची शहानिशा करायला हवी. त्यानंतर अहवाल करून संसदेत ठेवला पाहिजे. कोणी आला, कोणी सांगितले की थेट मीडियासमोर बोलणे चुकीचे आहे. कुठल्याही आयोगाची एक कार्यपध्दती असते, असे मलिक म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com