Nawab Malik Support Sharad Pawar : नवाब मलिकांनी केला पत्ता उघड; शरद पवारांना दिला पाठिंबा

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राजकीय वर्तुळातून तर्क वितर्कांना उधाण
Nawab Malik, Sharad Pawar
Nawab Malik, Sharad PawarSarkarnama

Mumbai News : गेल्या दीड वर्षांपासून तुरुगांत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकांना वैद्यकीय कारणास्तवर दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार की ज्येष्ठ नेते शरद पवार यापैकी कुणाला पाठिंबा देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर मलिकांनी आपला पत्ता उघड करत शरद पवारांच्या मागे उभे राहणार असल्याची भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे. (Latest Political News)

शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून मलिकांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने प्रकृती अस्वास्थतेमुळे सशर्त दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. तुरुंगातून बाहेर पडताच त्यांचे अजित पवार गटासह पवारांच्या राष्ट्रवादीनेही जंगी स्वागत केले. दरम्यान, मलिकांसाठी त्यांच्या मुलीने उपमुख्यमंत्री पवारांची भेटही घेतली होती. त्यामुळे मलिकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Nawab Malik, Sharad Pawar
Sharad Pawar On Mushrif : कोल्हापुरात जाऊन पवारांनी मुश्रीफांचा हिशेब चुकता केला; म्हणाले, '' ईडीच्या नोटिशीला सामोरे जाण्याची ताकद...''

नवाब मलिक तुरुंगात असताना राष्ट्रवादीत फूट पडून राज्यातील राजकीय स्थिती बदलली. या बदलेल्या स्थितीत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी पवारांचे निकटवर्तीय शिलेदारांनी अजित पवारांची पाठराखण केली. या पार्श्वभूमीवर तुरुंगातून बाहेर येताच मलिक अजित पवार की शरद पवार यापैकी कुणाला पाठिंबा देणार, याचीच चर्चा रंगली होती. आता त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिल्याचे सूत्रांची माहिती आहे.

Nawab Malik, Sharad Pawar
Thane Kalwa Hospital: कळवा हॉस्पिटल मृत्यू प्रकरण; अहवाल लांबला, चौकशी समितीने राज्य सरकारला केली 'ही' विनंती

दरम्यान, शरद पवारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे ईडीपुढे झुकले नाहीत, तर परिस्थितीला सामोरे गेल्याचे वारंवार सांगितले आहे. कोल्हापूर येथेही पवारांनी त्यांचे नाव घेत मंत्री हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली. अशातच मलिकांनी आपला शरद पवारांना पाठिंबा असल्याचेही जाहीर केले. त्यामुळे अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून मुक्तता केली. आता या पदावर लवकरच भुजबळ समर्थक शिवाजीराव नलावडे यांची नियुक्ती होणार असल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com