Thane Kalwa Hospital: कळवा हॉस्पिटल मृत्यू प्रकरण; अहवाल लांबला, चौकशी समितीने राज्य सरकारला केली 'ही' विनंती

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital: कळवा हॉस्पिटलच्या चौकशी समितीचा अहवाल लांबला
Thane Kalwa Hospital
Thane Kalwa HospitalSarkarnama

Thane News: ठाणे महापालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्ये १८ जणांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल शुक्रवारी २५ ॲागस्टला राज्य सरकारला सादर करण्याची अखेरची तारीख होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि जबाब नोंदवण्याची प्रक्रिया मोठी असल्यामुळे चौकशीला विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण या चौकशी समितीने दिले आहे. त्यामुळे कळवा हॉस्पिटलच्या चौकशी समितीचा अहवाल लांबला असून तो अहवाल कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कळवा हॉस्पिटलमध्ये एकाच रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. यावरून राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर विरोधकांनी जोरदार ताशेरे ओढले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कळवा हॉस्पिटलला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता.

Thane Kalwa Hospital
Uddhav Thackeray & Nitin Gadkari : ठाकरेंचं ठरलं, नागपूरमध्ये गडकरींच्या पराभवासाठी मोठं पाऊल उचललं; म्हणाले, '' मित्रपक्ष काँग्रेसला...''

या हॉस्पिटलमध्ये घडलेल्या मृत्यू प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. याबरोबरच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती देखील नेमण्याची घोषणा करत ही समिती या घटनेची सखोल चौकशी करून या चौकशीचा अहवाल २५ ऑगस्टपर्यंत सरकारला सादर करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते.

Thane Kalwa Hospital
Satara Political News : जिल्हा बॅंकेच्या सभेत रामराजे, उदयनराजे रमले हास्यविनोदात...

पण कळवा हॉस्पिटलच्या चौकशी समितीचा अहवाल लांबला असून या समितीने राज्य सरकारला पत्र लिहून निपक्ष आणि योग्य चौकशी करण्यासाठी आणखी वेळ वाढवून मागितला आहे. आणखी १५ दिवसांचा कालावधी या चौकशीसाठी द्यावा, अशी विनंती राज्य सरकारला समितीने केली आहे. याबरोबरच ही चौकशी करण्यासाठी विलंब का होत आहे, याची कारणे देखील समितीने राज्य सरकारला कळवली आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com