मुंबई : दाऊदशी (dawood) संबंध असलेल्या माणसांची नियुक्ती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वक्फ बोर्डावर केली आहे. ज्या डॉ मुदसैर लांबेंची नियुक्ती करण्यात आली त्यांचे दाऊदशी संबध आहेत,असा आरोप करत याबाबतच्या पुराव्याचा पेनड्राइव्ह विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (ता.14 मार्च) विधानसभेत सादर करत खळबळ उडवून दिली. मात्र, फडणवीसांनी केलेला हा दावा खोटा असल्याचे मलिकांची कन्या सना मलिक शेख यांनी सांगत ज्या डॉ. लांबेंवर फडणवीस आरोप करत आहेत. त्यांची नियुक्ती माझ्या वडिलांनी नाही तर फडणवीसांनीच केल्याचा दावा सना यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
सना शेख आपल्या ट्विटमध्ये डॉ. लांबे आणि फडणवीसांचा फोटो शेअर करत म्हणाल्या की, फडणवीसांनी सांगितलेलं अर्धसत्य हे पूर्ण खोटं आहे. डॉ. लांबेंची नियुक्ती ही 13 सप्टेंबर 2019 रोजी फडणवीस/भाजप सरकारने वक्फ बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. महाविकास आघाडी सरकारची स्थापना नोव्हेंबर 2019 मध्ये झाली. माझ्या वडिलांना जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात अल्पसंख्याक/वक्फ विभाग मिळाला, असे सना यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
फडणवीसांनी आज सादर केलेल्या पेनड्राईव्हमधील संवादात वक्फ बोर्डावर नियुक्त सदस्य डॉ. लांबें हे अर्शद खान यांच्याशी बोलत आहेत आणि त्यांचे दाऊदशी संबध असल्याचे सांगत आहेत. याबाबतचा पुरावा म्हणून त्यांनी या संवादाचा एक पेनड्राईव्हच विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला व तो संवाद सभागृहात वाचूनही दाखवला आहे.
फडणवीस म्हणाले, या पेनड्राईव्हमधील संभाषणात दोन पात्र आहेत. त्यापैकी एक मोहम्मद अर्शद खान आणि दुसरे म्हणजे ज्यांना डॉ. लांबे त्यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. लग्नाच्या आश्वासनामुळे ऑक्टोबर 2020 पर्यंत ही महिला पोलीस तक्रारीची वाट पाहत राहिली. मात्र, हा प्रकार समजल्यानंतर या महिलेच्या पतीने तिला घटस्फोट दिला. त्यामुळे या महिलेने लांबेला आत्महत्येचा इशाराही दिला. या महिलेच्या पतीविरोधात लांबेंनी चोरीची तक्रार दिली आहे. त्यानंतर या महिलेचा पती तुरुंगात गेला. मात्र लांबे मोकाट आहे, असा आरोप फडणवीसांनी केला.
याबरोबरच हा संवाद असलेला अर्शद खानचा मोबाईल संभाषण डिलीट करण्याआधी जप्त करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, सना यांनी केलेल्या दाव्यावर भाजप आणि फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.