Nawab Malik Bail : नवाब मलिकांचं राजकारण फिरणार; पवारसाहेब की अजितदादांच्या नव्या समीकरणात सामील होणार?

Supreme Court Grants Bail To Former Maharashtra Minister Nawab Malik : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मलिकांची जामीनावर सुटका झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Ajit Pawar : Sharad Pawar
Ajit Pawar : Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपच्या 'हिटलिस्ट'वर असलेले आणि ईडीच्या ताब्यात राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. यानिमित्ताने मलिकांना मोठा दिलासा मिळत असला; तरीही, राष्ट्रवादीतील फुटीमुळेच मलिक जामिनावर सुटल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आलेल्या मलिकांचे राजकारण फिरण्याची चिन्हे आहेत. त्यातून मलिक आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची साथ सोडणार का? किंवा फुटीर गटात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांची पाठराखण करणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar : Sharad Pawar
Sharad Pawar - Fadnavis News: शरद पवार-देवेंद्र फडणवीस येणार एकाच मंचावर; एकमेकांविषयी काय बोलणार?

याआधी मलिक यांच्या मुलगी सना मलिक यांनी अजितदादांची भेट घेतली होती. तर अजितदादांच्या बंडानंतर मलिक हेही त्यांच्यासोबत असतील, अशीही चर्चा होत होती. जामिनाच्या काळातच मलिक आपली राजकीय भूमिका स्पष्ट करून, नवे राजकारण जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस मलिकांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

मलिक हे कट्टर शरद पवार यांचे समर्थक समजले जातात. मात्र बदलेल्या राजकीय परिस्थितीत त्यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आणि अजितदादांनी भाजपशी बांधलेल्या संधानानंतर नवाब मलिक यांची कन्या अजितदादा यांची भेट घेतली होती. यामुळेच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांची जामीनावर सुटका झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे, नवाब मलिक यांना अटक होण्यापूर्वी मलिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही राजकीय आरोप केले होते.

Ajit Pawar : Sharad Pawar
Flying Kiss Controversy : राहुल गांधी 50 वर्षाच्या महिलेला 'फ्लाईंग किस' का देतील ? त्यांच्या मागे मुली कमी आहेत का? काँग्रेस आमदाराच्या वक्तव्याने वादात भर..

आता राज्यात सत्तेचे नवे समीकरण जुळून आले आहे. राज्य सरकारमध्ये भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये अजितदादांचाही समावेश आहे. यामुळे दीर्घकालावधीनंतर जामीनावर सुटका मिळालेल्या शरद पवार समर्थक मलिक त्यांच्याच गटात जातात की, अजितदादांच्या नव्या सत्ता समीकरणाशी जुळवून घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com