Nawab Malik Bail: फडणवीसांसोबत पंगा घेतलेल्या 'वजनदार' मलिकांचं २२ किलोनं घटलं वजन !

Nawab Malik Breaking News : सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर सोमवारी रात्री नवाब मलिक तुरुंगाबाहेर आले.
Nawab Malik News
Nawab Malik NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे; तर ठाकरे सरकारमधील 'वजनदार' नेता ठरलेल्या आणि भाजप नेतृत्त्व, तेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पंगा घेतलेले माजी मंत्री नवाब मलिकांना जामीन मिळाला. कायदेशीर प्रक्रिया होऊन सोमवारी रात्री ८ वाजता मालिक घरी आले. तब्बल दीड वर्षे तुरुंगात राहिलेल्या आणि आता बाहेर आलेल्या मालिकांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी जंगी स्वागत केले.

मलिकांना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाल्याने राष्ट्रवादीत दिवाळीच सुरू आहे. भाजपसोबत दोन हात केलेल्या मलिकांचे राजकीय वजन चांगले वाढल्याचे दीड वर्षांपूर्वी दिसून आले होते. पण याच मलिकांचे शारीरिक वजन मात्र आता खूपच कमी झाले आहे. तुरूंगातील दीड वर्षांच्या मुक्कामात मलिकांचे वजन तब्बल २२ किलोंनी कमी झाले असून, याआधी त्यांचे वजन ९६ किलो इतके होते. ते आता ७४ किलो झाले आहे.

Nawab Malik News
Nawab Malik Bail: नवाब मलिक दीड वर्षानंतर तुरुंगाबाहेर; पण कोर्टाच्या 'या' आदेशाचे करावे लागणार पालन

नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केल्यानंतर सोमवारी रात्री जामीनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते तुरुंगाबाहेर आले. 'गोवावाला कंपाऊंड'मधील मनी लाँडरिंग प्रकरणी मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ ला अटक केली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर मलिकांना ११ ऑगस्टला जामीन मंजूर झाला.

मलिक यांना दोन महिन्यांसाठी हा जामीन मंजूर करण्यात आला असून ते तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. पण या दीड वर्षाच्या कालावधीत मलिकांचे तब्बल २२ किलोंनी वजन कमी झाले आहे.

Nawab Malik News
Nawab Malik Bail: नवाब मलिक तुरुंगाबाहेर; कार्यकर्त्यांकडून 'ग्रँड वेलकम'

मलिकांनी प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. या जामिनाची प्रक्रिया न्यायालयात पूर्ण केल्यानंतर मलिकांची सोमवारी रात्री ८ वाजता तुरुंगातून सुटका करण्यात आली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com