Jitendra Awhad Arrest : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक : आव्हाडांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्ते झोपले

वर्तकनगर पोलिस ठाण्यासमोर आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास प्रचंड राडा झाला.
Jitendra Awhad Arrest Case
Jitendra Awhad Arrest CaseSarkarnama
Published on
Updated on

ठाणे : वर्तकनगर पोलिस (Police) ठाण्यासमोर आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास प्रचंड राडा झाला. हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटचा शो बंद पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना न्यायालयात घेऊन जात असताना राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते पोलिसांच्या गाडीसमोर आडवे पडले. या वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. मात्र, संतप्त कार्यकर्त्यांनी आव्हाडांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगून पोलिस कारवाईचा निषेध केला. (NCP activists aggressive: Activists slept in front of the police car carrying Jitendra Awhad)

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडणे आणि प्रेक्षकांना मारहाण करण्याच्या आरोपाखाली माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी आज दुपारी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर खुद्द आव्हाड यांनी पोलिस ठाण्यातूनच ट्विट करत अटकेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली.

Jitendra Awhad Arrest Case
आव्हाडांना अटक करायला आलेले डीसीपी म्हणाले, ‘मी काही करू शकत नाही; वरून आदेश आहेत’

दरम्यान, आव्हाड यांना न्यायालयात घेऊन जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्या गाडीच्या आडवे पडले. त्यामुळे वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या आवारात एकच गोंधळ उडाला. शेवटी पोलिसांना आव्हाड ठाण्यातच थांबवावे लागले. आव्हाडांची अटक बेकायदेशीर असून गुन्हाच घडला नाही तर अटक कशी करता, अस सवालही कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

Jitendra Awhad Arrest Case
कसली नाराजी..? मी राष्ट्रवादीत नाराज नाही : त्या चर्चेवर अमोल कोल्हेंनी टाकला पडदा

अटक झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाही तर तुम्ही पोलीस स्टेशनला या, असे ते म्हणाले. मी त्यावेळी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलिस स्टेशनला येतो आणि नंतर मुंबईला जातो.

Jitendra Awhad Arrest Case
अनिल देशमुखांच्या जामीन अर्जप्रकरणात मोठी घडामोड : न्यायमूर्तींचा सुनावणी घेण्यास नकार

मी पोलिस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलिस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही, तो गुन्हा मी कबूल करणार नाही, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com