आव्हाडांना अटक करायला आलेले डीसीपी म्हणाले, ‘मी काही करू शकत नाही; वरून आदेश आहेत’

मी त्यावेळी मुंबईला जायला निघालो होतो....
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

ठाणे : मी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गेल्यानंतर मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवण्यात आले. थोड्याच वेळात त्या ठिकाणी डीसीपी राठोड आले. ते मला म्हणाले की,‘मी काही करू शकत नाही. वरून आदेश आले आहेत, तुम्हाला अटक करावी लागेल,’ असे अटकेचे कथानक राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. (DCP who came to arrest Awhad said, 'I can't do anything; There are orders from above')

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडणे आणि प्रेक्षकांना मारहाण करण्याच्या आरोपाखाली माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी आज दुपारी अटक केली आहे. त्यानंतर आव्हाड यांनी पोलिस ठाण्यातूनच ट्विट करत अटकेची माहिती दिली आहे.

Jitendra Awhad
कसली नाराजी..? मी राष्ट्रवादीत नाराज नाही : त्या चर्चेवर अमोल कोल्हेंनी टाकला पडदा

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाही तर तुम्ही पोलीस स्टेशनला या, असे ते म्हणाले. मी त्यावेळी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलिस स्टेशनला येतो आणि नंतर मुंबईला जातो.

Jitendra Awhad
अनिल देशमुखांच्या जामीन अर्जप्रकरणात मोठी घडामोड : न्यायमूर्तींचा सुनावणी घेण्यास नकार

मी पोलिस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलिस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Jitendra Awhad
पन्नास खोक्यांचा वाद कोर्टात जाणार : राजकारण पुन्हा तापणार

हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही, तो गुन्हा मी कबूल करणार नाही, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com