Ajit Pawar : बळीराजाला कोर्टात जाण्याची वेळ येऊ देऊ नका ; अजितदादांनी सरकारला खडसावले

Ajit Pawar : अधिकारी आठमुठेपणा करत आहेत. याप्रकरणी आदेश काढणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
Ajit Pawar Latest Marathi News
Ajit Pawar Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

ajit pawar :अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, पण राज्य सरकारने त्यांना पीकविम्यांची रक्कम दिली नाही, यावरुन विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "शेतकरी संकटात असताना वीज कनेक्शन कट करण्याचा धंदा राज्य सरकारकडून सुरू आहे," असे पवार म्हणाले. (Ajit Pawar Latest News)

"शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नसल्याने त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अतिवृष्टी झालेली असताना सरकारकडून शेतकऱ्यांना मदत होतच नाही. 70 ते 90 रुपये पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतोय. सरकारने बळीराजाला कोर्टात जाण्याची आणि जलसमाधी घेण्याची वेळ येऊ देऊ नये. त्यासाठी शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करायला हवी, पण हे सरकार चर्चा करायला तयार नाही," अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

Ajit Pawar Latest Marathi News
Disha Salian Death Case : सीबीआयने राणेंना फटकारले ; आदित्य ठाकरेंना क्लिन चीट ?

"शेतकऱ्यांना पाणी लागत असताना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापली जात आहे, हे थांबविले पाहिजे.अजूनही वीज कनेक्शन तोडणी सुरू आहे. अंमलबजावणी अधिकारी वर्गाकडून ग्रामीण भागात होताना दिसून येत नाही. अधिकारी आठमुठेपणा करत आहेत. याप्रकरणी आदेश काढणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल," असे पवार म्हणाले.

Ajit Pawar Latest Marathi News
Disha Salian Death Case : सीबीआयने राणेंना फटकारले ; आदित्य ठाकरेंना क्लिन चीट ?

"शेतकऱ्यांनी दीड ते 3 हजार रुपये भरून पीकविमा काढले आहेत. मात्र, त्यांच्या खात्यात 70 ते 90 रुपये जमा होत आहे. राज्य सरकारकडून त्यांना कसलीच मदत झाली नाही. सरकारने बळीराजाला कोर्टात जाण्याची आणि जलसमाधी घेण्याची वेळ येऊ देऊ नये. त्यासाठी शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करायला हवी, चर्चेतून सर्व प्रश्न सुटतात, मात्र हे सरकार चर्चा करायलाच तयार नाही, शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या मदतीने प्रयत्न करायला हवे," असे अजित पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com