Ajit Pawar : शिवसेना, भाजपची जोरदार तयारी, पण चर्चा राष्ट्रवादीची...

Ajit Pawar : शिवसेना आणि भाजप या महायुतीच्या पक्षात रस्सीखेच सुरू आहे. मात्र महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) या सगळ्यापासून अलिप्त आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर

Thane: ठाणे शहराच्या विविध भागात रामायण महोत्सव तसेच रामकथा सुरू आहेत. श्रीराम मंदिर प्रतिकृती मिरवणूक काढत दीपोत्सव साजरा करण्याची तयारी देखील केली जात आहे. ठाण्यातील राजकीय वातावरण गुलाबी थंडीत चांगलेच तापले आहे. या धार्मिक कार्यक्रमात शिवसेना आणि भाजप या महायुतीच्या पक्षात रस्सीखेच सुरू आहे. मात्र याच महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) या सगळ्यापासून अलिप्त असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार गट या कार्यक्रमांमध्ये सक्रीय नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Ajit Pawar
Ashok Chavan News : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा, ते मात्र अ‍ॅक्शन मोडवर!

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात नुकतीच राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अजित पवार ठाण्यावर स्वतः लक्ष देतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. ठाणे शहरातील कार्यकर्त्यांना या बैठकीनंतर बळ मिळेल, असे वाटत होते. कार्यकर्ते देखील काही दिवस जोमाने कामाला लागल्याचे चित्र होते. मात्र, देशभर राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन होत असताना विविध धार्मिक कार्यक्रम आयोजनात अजित पवार गट मात्र सक्रीय नसल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि शिवसेनेकडून दावा सांगितला जाणार आहे. लोकांमध्ये पोहचण्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अजित पवार गटाला ही जागा मिळणार नाही त्यामुळे देखील कार्यक्रमापासून अजित पवार गट दूर असल्याचे बोलले जात आहे.

20 जानेवारीला मुख्यमंत्री ठाण्यात

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात भाजपने रामकथा, रामायण महोत्सव, महाआरती, दीपोत्सव आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तर, शिवसेने तर्फे श्रीराम मंदिर प्रतिकृती मिरवणूक, तसेच लेझर शोच्या माध्यमातून संपूर्ण श्रीराम चरित्र उलगडले जाणार आहे. धार्मिक कार्यक्रमा निमित्त 20 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक ही नेते मंडळी शहरात हजर राहणार आहेत.

(Edited By Roshan More)

Ajit Pawar
Sangli Politics : ...तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; म्हैसाळचा पाणीप्रश्न इरेला पेटला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com