Sharad Pawar Faction : शरद पवार गटांचं मोठं पाऊल; 'या' निकालाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव

Election Commission of India : लवकरात लवकर सुनावणी घेण्याची शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाकडे विनवणी
Sharad Pawar, Supreme Court
Sharad Pawar, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News :

खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच दिला होता. त्यानंतर काल (15 फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्षांनाही त्यांच्या निकालात अजित पवारांचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला होता. त्यावरून आता शरद पवार गटाने मोठे पाऊल उचलले आहे.

शरद पवार गटाने थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. (Sharad Pawar Faction in Supreme Court)

Sharad Pawar, Supreme Court
Ncp Crisis : मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा पवारांना धक्का, राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ अजितदादांच्या हातात

केंद्रीय निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारी रोजीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचे स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यामुळे शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी वेगळ्या नावाचा पर्याय दिला होता. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार हे नाव दिले आहे. (Election Commission of India)

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाने त्या निकालाचा संपूर्ण अभ्यास करून त्याला आव्हान देण्याची भाषा केली होती. त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

या संदर्भातील सुनावणी लवकरात लवकरत घ्यावी, अशी विनवणी शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टाकडे (Supreme Court) केली आहे. सुप्रीम कोर्टानेही त्यांनी विनंती मान्य केल्यामुळे पुढील आठवड्यात सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन करणारे शरद पवार (Sharad Pawar) बेदखल झाले आहेत. त्यामुळे या निकालाला आव्हान दिले जाईल, हे त्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले होते.

त्यानंतर काल ((15 फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या आमदार अपात्रता निकालातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचवेळी दोन्ही बाजूंचे आमदार पात्र असल्याचेही नार्वेकर यांनी निकालात स्पष्ट केले.

(Edited by Avinash Chandane)

Sharad Pawar, Supreme Court
NCP Crisis News : 90 टक्के राष्ट्रवादी अजितदादांसोबत, आव्हान दिलेच कशाला? आमदारांनी व्यक्त केल्या भावना!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com