Ncp Crisis : मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा पवारांना धक्का, राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ अजितदादांच्या हातात

Election Commission Big Decision on Ncp Crisis : निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिल्यानं शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Sharad Pawar Group Vs Ajit Pawar Group: केंद्रीय निवडणूक आयोगानं ( Election Comission ) शिवसेनेनं पाठोपाठ राष्ट्रवादीला ( Ncp ) मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिलं ( Election Comission Decision Ncp party Ajit Pawar ) आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. .

जुलै २०२३ मध्ये अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकार पाठिंबा दिला होता. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Sharad Pawar
Loksabha Election : फडणवीसांच्या दोन शिष्यांमधून विस्तवही जाईना, लातूरमध्ये भाजप 'हॅटट्रिक' करणार?

निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्यावर हुकूमशाहीनं पक्ष चालवल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच, राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणूक झाली नाही, असंही युक्तिवाद अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात केला होता.

Ajit Pawar, Sharad Pawar
NCP MLA Disqualification Case: शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीचा फैसला? राहुल नार्वेकर 'या' तारखेपर्यंत निकाल देणार

निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत स्वत: शरद पवार हजर असायचे. अशातच निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे दिले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. तसेच, बुधवारपर्यंत शरद पवार गटाला नव्या पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला कळवावं लागणार आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Solapur NCP : पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट; सोलापूर शहराला 9 वर्षांनंतर मिळणार नवा अध्यक्ष...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com